शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

२०२० चे आॅलिपिंक जिंकणे हेच ध्येय

By admin | Updated: November 3, 2016 01:00 IST

श्रीगोंदा : सन २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या आॅलिपिंक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हेच मुख्य ध्येय आहे. त्यासाठी मैदानात उतरणार आहे.

श्रीगोंदा : सन २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या आॅलिपिंक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हेच मुख्य ध्येय आहे. त्यासाठी मैदानात उतरणार आहे. देशाचा सन्मान जगभर उंचावण्यासाठी माझ्या प्रयत्नांना आई-वडिलांनी बळ दिल्याची भावना आंतराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिने व्यक्त केली.लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे बुधवारी ‘अग्निपंख फाउंडेशन’ या संस्थेने आयोजित २६ आदर्श मातांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ती बोलत होती. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ललिता बाबर हिला डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम खेलरत्न पुरस्कार व ५१ हजार रोख ‘अग्निपंख’च्या वतीने पालमंत्री राम शिंदे यांनी प्रदान केले. खडतर स्थितीत व परिस्थितीला हरवत जिद्दीने आपल्या पाल्यांना यशाचे शिखर दाखविणाऱ्या राज्यातील २६ महिलांचा ‘डॉ. कलाम आदर्श माताह्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ललिता बाबर म्हणाली, यशापयश खेळाचा भाग आहे. आई, वडील तसेच चुलत्यांनी पाठबळ दिल्यामुळेच मी आव्हानांवर मात करीत रिओच्या फायनलपर्यंत धडक मारली. २०२० चे आॅलिपिंक जिंकणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातील मुली पुढे जात आहेत. देशाचे नाव उंचविण्यात मुली अग्रेसर आहेत. मुलान्ांीही कठोर परिश्रमाची तयारी करावी. न्यूनगंड दूर करून अपार मेहनत केल्यास यश दूर नाही. मुलगा-मुलगी भेद आता कालबाह्य ठरत आहे, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. पालकमंत्री शिंदे म्हणाले, जीवनात उच्चपदी पोहचणाऱ्या पाल्यांच्या यशात माता-पितांचे खरे श्रेय आहे. अशा प्रेरणादायी मातांचा सन्मान करून मी खरोखर कृतार्थ झालो आहे. संघर्ष हे जीवनाचे दुसरे नाव आहे. यश हे आपसूक मिळत नसते. प्रयत्नांना प्रेरणेचे बळ असावे लागते, ते आईकडून मिळते. ललिता बाबर हिचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक आई-बाबांनी आपल्या पाल्यास उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘अग्निपंखह्ण संस्थेने कर्तृत्वान मातांना सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे.शिवाजीराव नागवडे म्हणाले, चांगुलपणाला दाद देणारा हा कार्यक्रम आहे. ज्यांचा सन्मान झाला, त्यांच्यामुळे अन्य पालकांनाही ऊर्जा मिळेल. ललिता बाबरसारखे धावपटू देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी पराकाष्टा करीत आहेत. तिच्या प्रयत्नांना आपण दाद दिली पाहिजे.‘अग्निपंख’चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. पुढील वर्षी १५ युवा शेतकऱ्यांचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. समाधान महाराज शर्मा यांनी ‘आई’वरील दीर्घकाव्य ऐकविले.पालकमंत्री शिंदे यांना चित्रकार सुनील शिंदे यांनी आईचे रेखाचित्र भेट दिले. कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार दगडू बडे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे, सभापती अर्चना पानसरे, माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, भगवानराव पाचपुते, नगरसेवक भरत नाहाटा मच्छिंद्र सुपेकर , केशव मगर, राजेंद्र म्हस्के, अतुल लोखंडे, सचिन कातोरे, ‘अग्निपंख’चे दिलीप काटे, सुरेखा शेंद्रे, प्रा. संजय लाकूडझोडे, शिवदास शिंदे, अ‍ॅड. दिलीप रोडे, शुभांगी लगड तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)