नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ मंदिराची दानपेटी शुक्रवारी रात्री चोरांनी फोडली. देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बहिरवाडी येथील कालभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडला. त्यानंतर मंदिरातील दोन दानपेट्या मंदिरामागील बाजूस नेऊन तोडल्या. मंदिर बंद असून याचाच फायदा घेऊन या चोरट्यांनी या दानपेट्या फोडल्या असल्याचे शनिवारी पहाटे मंदिराचे पुजारी परभत शिंदे यांच्या निदर्शनास आले. या दानपेट्यांमध्ये अंदाजे दीड हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी घटना धामोरी शिवारात दुचाकी चोरीची घडली. रवींद्र पठाडे यांची दुचाकी (क्र. एम. एच. १७ ए. के. ४१३५) घरासमोरून चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कालभैरवनाथ मंदिराची दानपेटी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST