कोपरगाव : तालुक्यातील विविध विभागांच्या प्रशासकीय तसेच कार्यालयीन कामकाजाचा आणि संभाव्य नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोपरगाव येथे नुकतीच भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, कृषी अधिकारी अशोक आढाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा रक्ताटे, वनरक्षक रामकृष्ण सांगळे, गोदावरी डावा कालव्याचे भरत दिघे, गोदावरी उजवा कालव्याचे महेश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे, आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांच्यासह सर्व प्रशासकीय कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.
या भेटीदरम्यान घेण्यात आलेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या कोरोना संसर्ग निर्मूलन उपाययोजना, नगरपरिषदेचे पाणीसाठवण तलावाचे संभाव्य कामकाज, पाटपाण्याचे आवर्तन नियोजन, सामाजिक वनीकरणाचे वृक्षारोपण, शहर व तालुका पोलीस ठाणे कामकाज, नवीन वाहन खरेदी, कृषी विभागाचे रबी पीक पेरणी नियोजन व अनुदान वाटप अहवाल, शासनाच्या मालकीच्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती यासह विविध खातेनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला.