शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

परीक्षा दिली पण़़़?

By admin | Updated: January 16, 2016 23:10 IST

अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची परीक्षा शनिवारी डी़एड़धारकांनी मोठ्या उत्साहात दिली़ मात्र, बीडमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याची वार्ता समजताच परीक्षार्थींचा उत्साह मावळला़

अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची परीक्षा शनिवारी डी़एड़धारकांनी मोठ्या उत्साहात दिली़ मात्र, बीडमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याची वार्ता समजताच परीक्षार्थींचा उत्साह मावळला़ बीडला पेपट फुटला मग आपले काय, असा प्रश्न हे परीक्षार्थी एकमेकांना करीत होते़ सायंकाळी उशीरा टीईटी परीक्षाच रद्द झाल्याची बातमी धडक्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली़ रात्री उशीरापर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात परीक्षेबाबत दूरध्वनीवरुन विचारणा होत होती़नगर शहरात ६२ केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा झाली. यात दोन्ही पेपरला मिळून २० हजार ३६६ पैकी १ हजार ७४८ परीक्षार्थींनी दांडी मारली. परीक्षा संपल्यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत पेपर सील करून ठेवण्यात आले असून रात्री पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. शनिवारी शहरातील ६२ शाळा, हायस्कूल येथे टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात पहिला पेपर झाला. या परीक्षेसाठी २९ केंद्र होते. या पेपरसाठी १० हजार ८६८ परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यातून परीक्षेसाठी ९ हजार ९१८ उमेदवार हजर होते. ९५० परीक्षार्थींनी पहिल्या पेपरला दांडी मारली. दुपारच्या टप्प्यात दुसरा पेपर झाला. या पेपरसाठी ९ हजार ४९८ परीक्षार्थी यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ८ हजार ७०० जणांनी पेपर दिला. या पेपरला ७९८ जणांनी दांडी मारली. परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या पथकाने विविध केंद्रांना भेटी देत पाहणी केली. परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात टीईटीचा पेपर फुटला असल्याची चर्चा नगरमध्ये धडकली. यामुळे शिक्षण विभाग काळजी घेताना दिसत होते. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, गुलाब सय्यद, विस्तार अधिकारी रमजान पठाण, शिवाजी कराड, एस. एम. वाव्हळ, अभयकुमार वाव्हळ यांनी परिश्रम घेतले. शनिवारी सायंकाळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पेपर फुटीमुळे टीईटी परीक्षा रद्द करण्याची घोषणा करीत दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली़ यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले़(प्रतिनिधी)