शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

नगरमधून वंचित बहुजन आघाडीकडून घनश्याम शेलार रिंगणात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:09 IST

काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघातून उमेदवार देण्याचे स्पष्ट केले असून,

अहमदनगर : काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघातून उमेदवार देण्याचे स्पष्ट केले असून, येत्या दोन दिवसांत अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे़ नगरमधून घनश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा आहे़़ शेलार यांनी मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो असे आघाडीतील नेत्यांना कळविले आहे़लोकसभा निवडणुकीत सध्या प्रस्थापित पक्षांसह अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी चर्चेत आहे़ राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघातून आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत़ उर्वरित २६ जागांवरील उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि़१५) जाहीर करण्यात येणार असल्याचे आघाडीचे राज्याचे प्रचारप्रमुख प्रा़ किसन चव्हाण यांनी सांगितले़ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घनश्याम शेलार यांच्याशी आघाडीतील नेत्यांनी संपर्क केला आहे़ धनगर आरक्षणासाठी लढा देणारे डॉ़ इंद्रकुमार भिसे यांनीही उमेदवारी देण्याची मागणी केली आहे़ लोकाधिकार आंदोलनाचे अ‍ॅड़ अरुण जाधव, सुधाकर आव्हाड, शिवाजी आढाव यांचीही नावे चर्चेत आहेत़ आपणही उमेदवारी करण्यास तयार असल्याचे चव्हाण म्हणाले.शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अ‍ॅड़ संतोष गायकवाड, पप्पू बनसोडे, गणेश बोराडे हे इच्छुक आहेत़ या दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांची गुरुवारी (दि़१४) नगर येथे बैठक होणार आहे़ त्यानंतर इच्छुकांची नावे कोअर कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत.शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सहसचिव अ‍ॅड़ कॉ. बन्सी सातपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे़ सातपुते यांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी चर्चेसाठी बोलविले आहे. कॉंग्रेस भवनमध्ये ती बैठक होणार आहे. कॉंग्रेस हा मतदारसंघ भाकपला सोडेल का? ही उत्सुकता आहे. दक्षिणेतून कॉ़ शंकर न्यालपेल्ली तर अ‍ॅड़ सुधीर टोकेकर यांच्या नावाची चर्चा आहे़ येत्या दोन दिवसात भाकपचा दक्षिणेतील उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ़ बाबा आरगडे यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर