अहमदनगर : गुढीपाडव्याला शनिच्या शिळेवर गंगाजल अर्पण करण्याची प्रथा आहे़ चौथऱ्यावरून गंगाजल अर्पण करण्यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत, तर पुरुष चौथऱ्यावर गेल्यास महिलाही जातील, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. यातून मार्ग काढावा, असे साकडे शिंगणापूर देवस्थानने जिल्हाधिकारी अनिल कवडे घातले़ त्यावर न्यायालयाचा आदेश पाळावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या़गुढीपाडव्याला शनि चौथऱ्यावर जाऊन गंगाजल अर्पण करण्याच्या मुद्यावरुन शिंगणापुरात नवा वाद निर्माण झाला आहे़ या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांच्यासह विश्वस्तांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेऊन चर्चा केली़ पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील बैठकीस उपस्थित होते़ शिंगणापुरात गुढीपाडव्याला दाखल होणाऱ्या कावडीधारकांना शनी चौथऱ्यावर प्रवेश देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली़ कावडीधारकांना चौथऱ्यावर प्रवेश देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक आहेत़ मात्र चौथऱ्यावर कुणालाही प्रवेश देणार नाही, अशी भूमिका देवस्थान विश्वस्तांनी मांडली. शुक्रवारच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
देवस्थानचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST