शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

सीटी बसला ‘डबल बेल’

By admin | Updated: July 1, 2014 00:15 IST

अहमदनगर: शहर बससेवा बंद झाल्याने नगरकरांचे हाल सुरू झाले. नगरकरांकडून बोंबाबोंब सुरू झाली. विरोधकांनीही त्याचे भांडवल करत जिल्हाधिकाऱ्यांनाच मार्ग काढण्याची गळ घातली.

अहमदनगर: शहर बससेवा बंद झाल्याने नगरकरांचे हाल सुरू झाले. नगरकरांकडून बोंबाबोंब सुरू झाली. विरोधकांनीही त्याचे भांडवल करत जिल्हाधिकाऱ्यांनाच मार्ग काढण्याची गळ घातली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एस.टी बसचा पर्याय सुचविला. बुधवारपासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र ही सुविधा महामार्गावरच लागू असणार असून उपनगरात सेवा दिली जाणार नाही. त्यामुळे या बैठकीत सीटी बसला तशी ‘डबल बेल’ मिळाली. तोट्याचे कारण सांगत प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेने १८ जून पासून शहर बससेवा बंद केली आहे. बससेवा बंद झाल्याने शहरवासीयांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. विरोधी सेनेने त्याविरोधात आवाज उठविला. मनपा प्रशासन दाद देईना म्हणून सेनेने जिल्हाधिकाऱ्यांनाच गळ घातली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अनिल कवडे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे नगर येथील अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांची बैठक घेतली. बैठक काही मिनिटेच चालली पण त्यातून एस.टी.चा पर्याय समोर आला. माळीवाडा व तारकपूर आगारातून स्थानिक बसेस जातात. त्यातून नगर शहरातील नागरिकांना प्रवास करता येणे शक्य आहे. शहरातील दिल्लीगेट, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, सावेडी नाका, बोल्हेगाव, नागापूर व एमआयडीसीतील थांब्यावर ही बस थांबविण्यात यावी. नियमानुसार तिकीट द्यावे. त्यामुळे नगरकरांना शहर बससेवेसारखीच सेवा मिळेल असा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला. परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यास संमती दर्शवित लगेचच ही सेवा देण्याबाबत स्थानिक बस वाहक, चालकांना सूचना दिल्या जातील असे सांगितले. महापालिकेनेही त्याला संमती दिली. बुधवारपासून ही सेवा सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)या मार्गावर होईल सोय माळीवाडा-एमआयडीसी-विळदतारकपूर-नेप्ती चौक-शिवाजीनगर,कल्याण रस्तामाळीवाडा-चांदणी चौक-स्टेट बॅँक चौक-भिंगार-आलमगीरमाळीवाडा-भूषणनगर- केडगाव-शाहूनगरमाळीवाडा-गोळीबार मैदान,सोलापूर रोडमाळीवाडा-तवलेनगर-गजराजनगर