अकोले : पैशांच्या व्यवहारातून अकोले नगरपंचायतीचे नगरसेवक व त्यांच्या पत्नीने एका वृध्द महिलेस आपल्या घरात डांबून ठेवल्याचा प्रकार शहराच्या पानसरवाडी भागात घडला़ ऐन दिवाळीच्या दिवसात धनत्रयोदशीला हा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे़ दरम्यान पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे.पहिली फिर्याद लक्ष्मीबाई चंद्रकांत पानसरे (वय ७०, रा. पानसरवाडी) या वृद्धेने दिली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, नगरसेवक परशुराम बाळचंद शेळके यांच्या घरी फॅब्रिकेशन कामाचे पैसे देण्यासाठी लक्ष्मीबाई गेल्या असता त्यांना शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास शेळके व त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करत घरात डांबून ठेवले. नगरसेवक शेळके व त्यांच्या पत्नी कविता यांच्या विरोधात पोलिसांनी लक्ष्मीबाई पानसरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.दुसरी फिर्याद कविता परशुराम शेळके (वय ४० रा. पानसरवाडी) यांनी दिली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, लक्ष्मीबाई पानसरे यांच्याकडे व्यवहाराचे पैसे मागितल्याचा राग येऊन त्यांनी घरात घुसून शिविगाळ करत दिवाळीच्या सामानाची नासधूस केली व मारहाण करुन घराच्या खिडकीची काच फोडली़ शेळके यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी लक्ष्मीबाई पानसरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एम. एस. खरमाळे व ए. पी. निपसे अधिक तपास करत आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवकाने डांबले वृद्धेला
By admin | Updated: October 29, 2016 00:48 IST