--
राष्ट्रवादीतर्फे अहिल्यादेवींना अभिवादन
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, विजय गव्हाळे, लंकेश चितळकर, गणेश बोरुडे, लहू कराळे, दीपक होले आदी उपस्थित होते.
------------
विनोदकुमार यांचे स्वागत
अहमदनगर : एमआयडीसीमधील भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रिय कार्यालयाचे नवनियुक्त क्षेत्रिय व्यवस्थापक विनोद कुमार यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशनच्या वतीने सोमवारी स्वागत करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष वैभव कदम यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच नव्याने रुजू झालेले व्यवस्थापक वासुदेव राव व नोवेल पिंटो यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राहक सेवेचे मुख्य प्रबंधक मनोज शहा, प्रबंधक शरद बाविस्कर, असोसिएशनचे सहसचिव विकास निकाळजे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वैभव कदम म्हणाले, स्टेट बँकेच्या अहमदनगर क्षेत्रिय कार्यालयात आता कोल्हापूरमध्ये उत्कृष्ट काम करणारे क्षेत्रिय व्यवस्थापक विनोद कुमार रुजू झाले आहेत. कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधून सर्वोकृष्ट काम होईल. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तारी यांनी केले. विकास निकाळजे यांनी आभार मानले.
----------------------