शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

संगमनेरातील नुकसानीचे पंचनामे सुरू

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

संगमनेर: संगमनेरला झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला भेट देवून पाहणी केली.

संगमनेर: संगमनेरला झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला भेट देवून पाहणी केली. प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देत त्यांनी नागरिकांना धीर दिला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, नगरसेवक दिलीप पुंड, नितीन अभंग, गोरख कुटे, गणेश मादास, सोमेश्वर दिवटे, शकील शेख, विश्वास मुर्तडक, रिजवान शेख, अनिस शेख तसेच प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे आदी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून संगमनेरांना मदतीची अपेक्षा आहे. अचानक झालेल्या या धुवाँधार पावसाने नागरिक हतबल झाले आहेत. गेल्या ५० वर्षात प्रथमत: इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस अनुभवल्याची चर्चा होती. (प्रतिनिधी) मंत्र्यांचे मदत कार्यमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने जेसीबी, बुलडोझर, ट्रॅक्टर, पाणी उपसा मशिन व मनुष्यबळ देत नुकसानग्रस्त भागात मदतकार्य करून पालकत्वाची भूमिका निभावली. संगमनेर-अकोले रस्त्यावरील बर्फ कारखाना परिसरात ओढ्याला कमरे इतके पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. या पाण्यात दोन दुचाकी वाहून गेल्या. तर मारूती कार पाण्यावर तरंगल्याने वाहन चालकांची चांगलीच घबराट झाली. नाटकी नाल्यात माती व कचऱ्याची भर पडल्याने अरूंद झाला आहे. त्यातच पावसाळा सुरू होण्यापुर्वी नगरपरिषदेकडून नाल्याची साफसफाई केली गेली नाही. त्याचे परिणाम गोरगरीब जनतेला भोगावे लागले. आधीच नाला साफ झाला असता तर ही परिस्थिती ओढवली नसती.