जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवार यांनी निवडक कार्यकर्त्यांसह चोंडी (ता. जामखेड) येथील सीना नदीवर असलेल्या २०० वर्षे जुन्या घाटाची साफसफाई केली.
त्यांनी मातीखाली बुजलेल्या घाटाच्या पायऱ्यांवरील माती बाजूला काढल्यामुळे २३ पायऱ्या अनेक वर्षांनंतर उघड्या झाल्या आहेत. चोंडी येथील वाडा आणि महादेव मंदिर परिसरातील पायऱ्यांना अहिल्यादेवी घाट म्हणून ओळखले जाते. गेल्या २०० हून अधिक वर्षांपासून हा घाट मातीत बुजला होता. त्यावरील माती दोन पोकलँडद्वारे काढण्यात आली. त्यामुळे पुरातन काळातील पायऱ्या मोकळ्या झाल्या आहेत. मागील २५ वर्षांपासून चोंडी येथील अहिल्यादेवी यांच्या गडाचा विकास चालू आहे. मात्र, या घाटाची सफाई झाली नव्हती. आता या पुरातन पायऱ्यांची स्वच्छता झाल्याने परिसराला वेगळे स्वरूप आले आहे.
---
३१ रोहित पवार
३१ चोंडी येथील सीना नदीपात्रातील जुन्या घाटाची आमदार रोहित पवार यांनी स्वच्छता केली.