अहमदनगर- रचना कला महाविद्यालय व लोकमत बालविकास मंच यांच्या वतीने ३१ आॅगस्ट रोजी आयोजित केलेल्या वर्धापन दिन चित्रकला स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धेसाठी सुमारे १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सात वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणपती व आवडता खेळ व खेळणी या विषयावर उत्तम चित्रे काढली. स्पर्धेसाठी वसंत पेन्टस् , वेट अॅण्ड जॉय वॉटर पार्क शिर्डी, आसरा स्टेशनर्स यांनी विविध बक्षिसे दिली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष अजित बोरा, वसंत पेन्टस्चे संचालक वसंत बोरा, संपत बोरा, आसरा स्टेशनर्सचे संचालक शामजी नोर, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय जामगांवकर, माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांचे हस्ते झाले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर तर आभार प्राचार्य सुभाष भोर यांनी केले. स्पर्धेचा निकाल असा:- गट (१) बालवाडी: प्रथम- आरुष हेमंत विटणकर, द्वितीय- जय योगेश दाळावाले, तृतीय- संस्कृती संतोष वाघसकर. गट (२) पहिली-दुसरी: प्रथम- गुंदेचा तन्मय एस., द्वितीय- शिदोरे निमिष रुपेश, तृतीय- गुंजाळ शिवम विष्णुवंत. गट (३) तिसरी-चौथी: प्रथम- कुलकर्णी श्रृती राहुल, द्वितीय- भारताल स्वानंदी विवेक, तृतीय- विटनकर हिया. गट (४) पाचवी-सहावी: प्रथम- नागवडे कौशल्य, द्वितीय- भारताल समृद्धी विवेक, तृतीय- मालवडकर आर्या एम. गट (५) सातवी-आठवी: प्रथम- पवार प्रदिप वसंत, द्वितीय- ससाणे अंकित संजय, तृतीय-शिदोरे विनया आर. गट (६) नववी-दहावी: प्रथम- रासकर भरत शरद, द्वितीय- शेटिया निधी, तृतीय- वाबळे संयोगिता संजय. गट (७) मुकबधीर-अपंग: प्रथम- सलीम नवाब कुशीर, द्वितीय- कदम निलेश रामकृष्ण, तृतीय- देशमुख गणेश बबन. (प्रतिनिधी)
मुलांनी केली रंग-रेषांशी दोस्ती
By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST