शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

कावडीधारकांनी नियम मोडल्याने महिलांना चौथरा खुला

By admin | Updated: April 9, 2016 00:31 IST

अहमदनगर : शुक्रवारी कावडीधारकांनी चौथऱ्यावर जात शिळेला जलाभिषेक केला. त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांना स्त्री-पुरुष अशा दोघांसाठीही चौथरा खुला करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अहमदनगर : शनी चौथऱ्याचा प्रवेश पुरुषांसाठीही बंद असताना शुक्रवारी कावडीधारकांनी चौथऱ्यावर जात शिळेला जलाभिषेक केला. त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांना स्त्री-पुरुष अशा दोघांसाठीही चौथरा खुला करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या धाडसी निर्णयातून देवस्थानने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. शिंगणापूर चौथऱ्यावरील महिला प्रवेशाचे मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवलही केले गेले. राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी याविषयी थेट यशवंतराव गडाख यांच्यावर टीका केली होती. मात्र, हा निर्णय घेणे हे गडाख यांच्यासाठीही सहजसोपे नव्हते. कारण देवस्थानच्या विरुद्ध स्थानिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर राजकारण पेटविले गेले. नेवासा हा वारकरी संप्रदायाला मानणारा तालुका आहे. विद्यमान भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे हे वारकरी आहेत. ‘जय हरी’ ही त्यांची निवडणुकीतील घोषणाच होती. मात्र, आमदार मुरकुटे यांनी याप्रश्नी भूमिका घेतली नाही. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आध्यात्मिक क्षेत्राला या विषयावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, आध्यात्मिक क्षेत्रातून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. देवस्थान बचाव कृती समितीही प्रथा मोडण्यास विरोध करत होती. त्यामुळे महिला प्रवेशाचा निर्णय कशाच्या जोरावर घ्यायचा हा देवस्थान ट्रस्टसमोरही मोठा प्रश्न होता. त्यामुळेच स्त्री-पुरुष या दोघांनाही बंदी या विषयावर विश्वस्त ठाम होते. मात्र, कावडीधारकांनी हा नियम पाळला नाही. त्यामुळे देवस्थानलाही नाईलाजास्तव महिला प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला.महिला अध्यक्षांच्या कार्यकाळातील धाडसी निर्णयशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये या वर्षी प्रथमच अनिता शेटे व शालिनी लांडे या महिलांची निवड केली. अध्यक्षपदी शेटे यांची नियुक्ती करण्यात आली. आता महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्याने स्त्री-पुरुष समानतेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. नेवासा तालुक्यात यशवंतराव गडाख यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करताना कारखान्याचा पहिला शेअर्स एका महिलेच्या नावाने काढला होता. देवस्थानने घेतलेले निर्णय२०११ : ओल्या वस्त्रांनिशी भाविकांच्या दर्शनाची प्रथा बंद केली. जानेवारी २०१६ : पुरुषांच्या हस्ते शनी चौथऱ्यावर आरती होत होती. या आरतीसाठी ११ हजार रुपये शुल्क आकारले जात होते. ती प्रथा बंद केली. देसार्इंच्या दर्शनावेळी ग्रामस्थांची अनुपस्थितीशनि चौथरा महिलांना खुला झाल्यानंतरही गावातील महिलांनी पहिल्या दिवशी चौथऱ्यावर प्रवेश केला नाही़ तृप्ती देसाई यांनी चौथरा प्रवेश केला त्यावेळी स्थानिक महिला, गावकरी व विश्वस्त अनुपस्थित होते़ परगावच्या भाविकांनी मात्र, दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती़ या निर्णयाने शिंगणापुरातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे़