शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

शिक्षण समिती सदस्यांचा बहिष्कार

By admin | Updated: May 27, 2014 00:28 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या मासिक सभेवर सोमवारी चार जिल्हा परिषद सदस्यांनी बहिष्कार टाकला.

अहमदनगर : जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या मासिक सभेवर सोमवारी चार जिल्हा परिषद सदस्यांनी बहिष्कार टाकला. शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या नावाचा गैरवापर वापर करत असल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची एकत्रित भेट घेतल्याशिवाय समितीच्या बैठकीला बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बहिष्कार टाकणार्‍यात सदस्य प्रवीण घुले, संभाजी दहातोंडे, परभत नाईकवाडी आणि अ‍ॅड.आझाद ठुबे यांचा समावेश आहे. सोमवारी जि.प. शिक्षण विभागाची मासिक सभा होती. सभेच्या सुरूवातीला इतिवृत्त वाचन सुरू असतांना सर्व शिक्षण अभियानातून पूर्ण झालेल्या बांधकामाचा शिल्लक पाच टक्के निधी का अदा करण्यात आला नाही? यावरून वादाला सुरूवात झाली. गत सभेत याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये अधिकार्‍यांनी मनमानी केलेली असून सर्व शिक्षा अभियानातील लेखाधिकारी गरज नसतांना दुसर्‍या ठिकाणी हलविले. आता पुन्हा त्याच कर्मचार्‍यांना पुन्हा मूळ ठिकाणी आणण्यात येत आहे. यामुळे या सर्व शिक्षा मध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. समितीचे सदस्य वर्षभरापासून जिल्ह्यात सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यांची कोणतीच दखल घेतली जात नाही. प्रत्येक ठिकाणी शिक्षक, केंद्र प्रमुख यांना जबाबदार धरणात येत आहेत. मात्र, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांना यातून सहिसलामत सोडण्यात आलेले आहे. शिक्षणाधिकारी गोविंद प्रत्येक गोष्टीत मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांचे नाव घेत आहेत. गत वर्षी शिक्षण विभागाने निकृष्ट दर्जाचे दप्तर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सदस्यांनी हा डाव हाणून पाडला. अनेक विषय खरेदी शिक्षण समितीपुढे चर्चेला येणे आवश्यक असतांना प्रशासकीय कारण देत त्यांना बगल देण्यात येत आहे. शिक्षण विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित आहे. मात्र, शंभर टक्के खर्च झाला असल्याचे सांगण्यात येते. फेबु्रवारी महिन्यांत शिल्लक निधीची माहिती विचारण्यात आलेली होती. मात्र, अद्यापही त्याचा तपशील देण्यात आला नसल्याचे सदस्य ठुबे यांनी सांगितले. सर्व शिक्षा अभियानाचे बजेट तयार करतांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप सदस्य घुले यांनी केला.शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत अनेक वेळा तक्रार करून उपयोग झालेला नाही. यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लंघे आणि मुख्य कार्यकारी नवाल यांच्या सोबत एकत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेनंतर या चार सदस्यांनी बहिष्काराची माहिती पत्रकारांना दिली. याबाबत उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. शिक्षण समितीच्या सदस्यांना विश्वासात घेण्यात येत नाही. त्यांच्या परस्पर कामे होत असतील ही समितीच बरखास्त करून त्याबाबत शासनाला अहवाल द्या. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच ही समिती चालवावी. - संभाजी दहातोंडे, सदस्य