शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात पोपट सुपेकर तसेच त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटकेमध्ये अक्षय संभाजी काळे (वय १९) व सचिन संभाजी काळे (वय २७, दोघे रा. पिंपळवडी, ता. कर्जत) यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे तीन पथक तात्काळ कार्यान्वित करण्यात आले होते. या पथकाने आणखी तिघा जणांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. कर्जतचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंतले, हजारे तसेच पांढरकर यांनी काम पाहिले. पुन्हा लुटमार घरफोडीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी कुळधरणनजीक घालवडी जंगलानजीक शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ट्रक चालकाला लुटले. कुळधरणहून जाताना गाडी रस्त्यात आडवी उभी करुन ट्रक अडविला. व चालकाला मारहाण करुन साडेदहा हजारांची रोकड व मोबाईल लांबविला. चालकाने ट्रक वळवून पर्याची रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नऊ ते दहा जण शस्त्रे घेऊन आडवे आल्याने त्यांना सुटका करुन घेता आली नाही. खेड येथील धुमाकूळ संपवून चोरट्यांनी कुळधरणला ‘लक्ष्य’ केल्याने या भागात घबराटीचे वातावरण आहे. चोरट्यांच्या धास्तीने घरातील लोक आळीपाळीने जागरण करीत आहेत. (वार्ताहर)तपास योग्य दिशेने सुरू आहे. ग्रामसुरक्षा दल सक्षम करण्यात यावे, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवता जागरुक राहून गस्त सुरु ठेवावी. धार्मिक कार्यक्रम तसेच शेतातील कामे करणार्‍या ट्रॅक्टर्स चालकांनी लाऊडस्पिकरचा वापर टाळावा. नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक, कर्जत गुंड गटाची सत्ता असलेल्या कुळधरण ग्रामपंचायतीत ग्रामसुरक्षा दलाची यादी तयार करण्यात आली. मात्र सोयीनुसार ठराविक नावेच घेण्यात आल्याचा आरोप करीत विरोधक जगताप कार्यकर्त्यांनी आपलीही नावे यादीत टाकून घेतली. या राजकीय घोळामुळे ग्रामपंचायतीने ही यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठविली नसल्याने गावात ग्रामसुरक्षा दलच अस्तित्वात नाही. सध्या चोरट्यांच्या दहशतीमुळे गावात रात्री आपापली गस्ती पथके फिरत आहेत. मात्र उपसरपंच सतीश कळसकर यांनी आता ही यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठवू, असे सांगितले.