पाथर्डी : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे बंडूशेठ बोरूडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर बोरूडे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला़ तसेच बोरुडे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.शनिवारी (दि़१६) सकाळी प्रातांधिकारी ज्योती कावरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात उपनगाराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक झाली. उपाध्यक्षपदासाठी बंडूशेठ बोरूडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रातांधिकारी ज्योती कावरे यांनी जाहीर केले. बोरूडे यांनी दिपाली बंग यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. नगराध्यक्ष राजेंद्र उदमले यांनी त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, दिपाली बंग, मंगल कोकाटे, प्रियंका काळोखे, स्वाती सोनटक्के, गटनेते नंदकुमार शेळके, प्रमोद भांडकर उपस्थित होते. बोरुडे हे राजीव राजळे यांच्या समर्थक मानले जातात़(तालुका प्रतिनिधी)
बोरुडे उपनगराध्यक्ष
By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST