राजूर : जिल्ह्यात सर्वत्र दृष्काळसदृश स्थिती असताना अवघ्या महिनाभराच्या पावसावर भंडारदरा धरण भरल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे अगदी शेवटच्या टप्प्यात पाऊस होऊनही १५ आॅगस्टपर्यंत धरण भरण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. धरणाच्या जलाशयावरील लाटा गुरूवारी दुपारी सांडव्याबाहेर झेपावू लागल्या. दुपारी दोन वाजता या धरणातील पाणीसाठा १० हजार २१३ दलघफूटापर्यंत पोहचला आणि जलसंपदा विभागाने तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर केले.धरणाच्या पाणलोटात मान्सूनचे आगमन सुमारे दीड महिना उशाराने झाले. त्यामुळे धरण १५ आॅगस्टपूर्वी भरते की नाही याबाबत साशंकता होती. मात्र गुरूवारी धरणातील पाणीपातळी २१४.१० फूट झाली आणि अखेर धरण भरले.भंडारदऱ्याच्या पाणलोटात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होत असतो. परंतु यावर्षी पावसाने जूनमध्ये जरा ताणच दिला. ११ जुलैला पाणीसाठा अवघा अर्धा टीएमसी होता. मात्र १७ जुलैला म्हणजेच तब्बल एक महिन्यानंतर पावसास सुरूवात झाल्याने साठा पुन्हा १ हजार २० दलघफू झाला. पावसातील सातत्यही टिकून राहू लागले. २८ जुलैपर्यंत साठा ३ हजार ६१९ दलघफू झाला आणि त्याच दिवसापासून पाणलोटाला साजेसा पाऊसही सुरू झाला.पाण्याची आवकही झपाट्याने होऊ लागली. २८ जुलै ते ८ आॅगस्ट या १२ दिवसांत तब्बल सहा टीएमसी नवीन पाण्याची आवक होत धरणातील साठा ९ हजार ६४२ दलघफू झाला. यानंतर दोन-तीन दिवसात धरण भरण्याची उत्सुकता वाढीस लागली. या कालावधीत वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येऊ लागले होते. मात्र नऊ आॅगस्टपासून पाणलोटातील पावसाचा जोर एकदम कमी झाला आणि धरण १५ आॅगस्टपूर्वी भरण्याच्या आशा मावळू लागल्या. ९ हजार ८३० दलघफूटाहून १० हजार १४७ दलघफू पाणीसाठा होण्यास चार दिवसाचा कालावधी लागला. नंतरच्या कमी-अधिक पावसाने १५ आॅगस्टपूर्वी धरण भरण्यास हातभार लावला. गुरूवारी सकाळी सहा वाजता हा साठा १० हजार ५३३ दलघफू झाला आणि धरण आज तांत्रिकदृष्ट्या भरले.धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टनेलमधून ८१७ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झालीअसा आशावाद जलसंपदाच्या सुत्रांनी व्यक्त केला. (वार्ताहर)१७ दिवसात भरले१७ जुलैपर्यंत खपाटीला गेलेले भंडारदऱ्याच्यापोटात २८ जुलैपर्यंत साडेतीन टीएमसी पाणी आले होते. मात्र यानंतर १७ दिवसांत ११ हजार ३९ दलघफू क्षमतेचा हा जलाशय तांत्रिकदृष्ट्या भरला आणि आज दिवसभर या निळ्याशार जलाशयावरून पाण्याच्या लाटाही झेपावू लागल्या.आता निळवंडे ओव्हरफ्लोची उत्सुकता...धरण भरल्याची माहिती सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी पालकमंत्री मधुकरराव पिचड व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दूरध्वनीवरून कळविल्यानंतर या मंत्री वर्गानेही समाधान व्यक्त केले. ४भंडारदरा धरण भरल्यानंतर आता निळवंडे ओव्हरफ्लोची उत्सुकता आहे. यावर्षी निळवंडे धरणाच्या झालेल्या बांधकाम क्षमतेनुसार ६ हजार ५०० दलघफू पाणी साठेल, यानंतर झालेल्या बांधकामावरून पाणी प्रवरा पात्रात झेपावेल. आज सकाळी या धरणातील पाणी साठा ५ हजार १५६ दलघफू झाला होता.
भंडारदरा धरण भरले
By admin | Updated: August 14, 2014 23:14 IST