शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

... अन् भारताच्या खडबडीत रस्त्यांवर धावल्या नगरच्या लुना

By admin | Updated: May 16, 2016 00:08 IST

अहमदनगर : परदेशी कंपनीचा कुठलाही पार्ट व मशीन वापरायचे नाही. ही ‘लुना’नगरलाच बनवायची. तिचे वजन पन्नास किलो तर किंमतही दोन हजाराच्या आत हवी, अशा विविध अटी वडिलांनी आपणाला टाकल्या होत्या.

अहमदनगर : परदेशी कंपनीचा कुठलाही पार्ट व मशीन वापरायचे नाही. ही ‘लुना’नगरलाच बनवायची. तिचे वजन पन्नास किलो तर किंमतही दोन हजाराच्या आत हवी, अशा विविध अटी वडिलांनी आपणाला टाकल्या होत्या. अवघे पंधरा लाखांचे भांडवल त्यासाठी दिले होते. हे सगळे आव्हान आपण स्वीकारले व ‘लुना’ बनवली. नगरची व कायनेटिकची हीच लुना भारताच्या खडबडीत रस्त्यांवरुन सुसाट धावली, अशा ‘लुना’च्या आठवणी कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया यांनी ‘लोकमत’च्या समारंभात उलगडल्या. ‘लोकमत बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या समारंभात फिरोदिया बोलत होते. ते म्हणाले, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादन केले तर आपण उद्योगात यशस्वी होऊ शकतो. यासाठी त्यांनी ‘लुना’चे उदाहरण दिले. मी अमेरिकेत एका कंपनीत नोकरी करत असताना वडिलांच्या सल्ल्यानुसार भारतात आलो़ वडिलांच्या सूचनेनुसार नगरला लुनाचे उत्पादन सुरु केले. नवीन वाहन बाजारात आणत असताना ते कसे असावे, हे समजून घेणे गरजेचे होते़ त्यासाठी ठिकठिकाणी दुचाकीचे मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्यांचे सल्ले घेतले़ एकाने सांगितले, अनेकजण इंधनात रॉकेल वापरतात. त्यामुळे इंजिनमध्ये मोठा कार्बन जमा होऊन वाहन मेंटेनन्स वाढतो. त्यामुळे लुनाचे इंजिन उलटे बसवा. त्यामुळे लुनात तसा बदल केला. एक ग्राहक म्हणाला, खडबडीत रस्त्यांमुळे दुचाकी सतत पंक्चर होते. त्यामुळे चाक न खोलता लुनाचा पंक्चर काढता यायला हवा. तसाही बदल केला. दुचाकीचे इंजिन खोलल्यानंतर सर्वच वस्तुंचा मेंटेनन्स निघतो. त्यामुळे ‘लुना’चा गिअरबॉक्स, क्लच व मशीन वेगळे ठेवण्याचा सल्ला एका फिटरने दिला. हाही बदल आम्ही स्वीकारला. ग्राहक मागणी करतील तसे प्रयोग मी करत गेलो. त्याच जोरावर पन्नास लाख लुना विकल्या. इटलीमधील एका कंपनीत गेलो तेव्हा तेथील ‘आर अ‍ॅण्ड डी’ विभागात मला लुना दिसली. आमची लुना येथे कशी? म्हणून मी आश्चर्यचकित झालो. बाजारात दरवर्षी नव्याने येणारी लुना आम्ही येथे घेऊन येतो व त्यावर संशोधन करतो़, असे त्या कंपनीचे म्हणणे होते. भारतातील रस्ते अतिशय खडबडीत आहेत़, पेट्रोलमध्ये भेसळ आहे, तरीही या रस्त्यावर तुमची लुना व्यवस्थित चालते़, वजन ओढते आणि मेंटेनन्स काढत नाही, याचे त्या कंपनीला नवल वाटत होते. सदानंद जोशींमुळे अमेरिका समृद्ध महाराष्ट्रीयन माणूस उद्योगात पहिल्यापासून अग्रेसर आहे़ त्यांचा इतिहास मात्र, आपल्यापर्यंत पोहोचला नसल्याची खंत फिरोदिया यांनी व्यक्त केली़ ते म्हणाले, राईट बंधुंनी पहिले विमान उडविल्याचे सांगितले जाते़ प्रत्यक्षात मात्र, मुंबई येथे शिवरत्न बापूजी तळपदे या महाराष्ट्रातील व्यक्तीने पहिले विमान उडविले.भारतात इंग्रजांनी पहिल्यांदा रेल्वे आणली, असे सांगितले जाते़ इंग्रजांच्या आधी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी मुंबईत रेल्वे आणली आणि ती सुरू केली़ इंग्रजांनी याला प्रथम विरोध केला़ मात्र, रेल्वेचा उपयोग पाहून त्यांनी भारतात रेल्वेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला़ जगात कॅमेऱ्याचा शोध लागल्यानंतर चार वर्षांतच मुंबईच्या धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके यांनी भारतात प्रथम चित्रपट निर्मिती केली़ मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलच्या इमारतीचे डिझाईन महाराष्ट्रातील सखाराम वैद्य याने केलेले आहे़ सदानंद जोशी या महाराष्ट्रातील युवकाने अमेरिकेत नोकरी करत असताना तेथील वाळवंटातून कशी तेल निर्मिती करता येईल, याचा शोध लावला़ एकेकाळी आखाती देशातून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारी अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली़ या नव्या शोधामुळे जगात तेलाचे दर झपाट्याने कमी झाले़ हे महाराष्ट्राच्या सदानंदचे योगदान असल्याचे फिरोदिया यांनी यावेळी सांगितले़