अहमदनगर : महापालिकेचा नियोजनशून्य कारभार आणि राजकीय हस्तक्षेप, यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जैसे असून, शहरातील ३२ हजार नागिरकांना बुस्टर डोसची प्रतीक्षा आहे.
शहरातील कोविशिल्डचा पहिला डोस ४५ हजार नागरिकांना देण्यात आला आहे. कोरोनावरील डोसचे दोन डोस असतात. कोविशिल्डचा दुसरा बुस्टर डोस ८४, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ४५ दिवसांनी घेणे अपेक्षित आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा आदेश दिला आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपकेंद्रालाही हा नियम लागू आहे. मनपाने शहरातील विविध भागात नव्याने २० लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. तसेच मनपाची नऊ उपकेंद्र आहेत. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या २९ झाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. काही केंद्रांवर २० डोस उपलब्ध होत असून, प्राधान्यक्रमाचे नियम पाळणे कठीण झाले आहे. नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पहिल्या डोससाठीही नागरिक केंद्रांवर रांगा लावत आहेत. त्यामुळे प्राधान्य कुणाला द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
...
असे झाले लसीकरण
एकूण लसीकरण
८३ हजार २६१
....
पहिला डोस
६० हजार ९२८
...
दुसरा डोस
२२ हजार ३३३
....
कोविशिल्ड
पहिला डोस-४५ हजार ३७९
दुसरा- १५ हजार ५०१
....
कोव्हॅक्सिन
पहिला- ९ हजार ५८
दुसरा- ६ हजार ५१
.....