अहमदनगर : दहावीचा लागलेला निकाल आणि जिल्ह्यात अकरावीच्या जागा पाहता सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश मिळणार आहेत. मात्र, काही ठरावीक ज्यूनिअर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गर्दी होणार असल्याची शक्यता असल्याने सर्व ज्यूनिअर कॉलेज व्यवस्थांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नयेत, त्यांना अतिरिक्त जागांसाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी परशराम पावसे यांनी सांगितले.दहावीच्या निकालांनतर शिक्षण विभागाने तातडीने शहरातील सर्व ज्यूनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली आहे. त्यांना अकरावी प्रवेशसंदर्भात सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. नगर शहरात कला शास्त्र आणि वाणिज्य शाखेचे ३८ तर नगर तालुक्यात १२ ज्यूनिअर कॉलेज आहेत. या ठिकाणी १३१ तुकड्यांमध्ये सुमारे अकरा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. तसेच जिल्ह्यात नव्याने स्वय: अर्थहाय्यीत ८८ ज्यूनिअर महाविद्यालयांना मान्यता मिळालेली आहे. यात नव्याने ७ हजार ४० जागांची निर्मिती होणार आहे. दहावीचा निकाल नवीन अभ्यासक्रमात ६४ हजार १८३ तर जुन्या अभ्यासक्रमातून १ हजार ११९ विद्यार्थी पास झालेले आहे. जिल्ह्यात जुन्या ६५ हजार जागा आणि नव्याने निर्माण होणाऱ्या ७ हजार जागा यामुळे विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे.मात्र, शहरात काही विशिष्ट ज्यूनिअर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी गर्दी होत असते. यामुळे या ठिकाणी गुणवत्ता यादीनुसार मंजूर प्रवेशापेक्षा अधिक जागांना मान्यता न देण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतलेला आहे. निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी जवळजवळ सर्व ठिकाणी प्रवेश अर्ज विक्रीस प्रारंभ झाला आहे. शहरात अनेक ज्यूनिअर कॉलेजमध्ये हे अर्ज घेण्यासाठी तुरळक गर्दी झालेली दिसली. (प्रतिनिधी)असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक१९ ते २६ जून प्रवेश अर्ज विक्री२७ ते २८ जून ज्यूनिअर कॉलेजकडून प्राप्त अर्जाची नोंदणी ३० जून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे२ जुलै अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे३ ते ५ जुलै गुणवत्ता यादी प्रमाणे प्रवेश प्रक्रिया७ ते १४ जुलै प्रतीक्षा यादी क्रमांक १ ते ३ प्रसिध्द करणे१५ जुलै प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश प्रक्रिया१६ ते १९ जुलै गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया.
अतिरिक्त प्रवेशावर बंदी
By admin | Updated: June 20, 2014 00:28 IST