शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
4
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
5
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
6
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
7
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
8
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
9
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
11
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
12
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
13
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
14
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
15
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
16
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
17
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
18
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
19
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
20
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?

३५५ गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

अहमदनगर: सन २०१३-१४ मधील रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पेक्षा कमी असणारी जिल्ह्यातील ३५५ गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़

अहमदनगर: सन २०१३-१४ मधील रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पेक्षा कमी असणारी जिल्ह्यातील ३५५ गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ टंचाईग्रस्त घोषित गावातील खातेदारांना विविध सवलती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़रब्बी हंगामात अत्यल्प पाऊस पडला आहे़ कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यातील गावांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले़ प्रत्येक गावातील माहिती घेऊन टंचाईग्रस्त गावांचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सात तालुक्यातील ३५५ गावांची पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी निघाली आहे़ त्यामुळे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत़या सवलतीस टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ पात्र ठरतील़ टंचाईग्रस्त गावात नगर तालुक्यातील सर्वाधिक ९५ गावांचा समावेश आहे़जून महिना कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ वेळेत पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत़ रब्बी हंगामात पाऊस न पडलेल्या गावांत भीषण टंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे वरील घोषणा करण्यात आली असून, घोषित गावातील खातेदारांना महसुलात सूट दिली जाईल़ सहकारी कर्जाचे रुपांतर करून कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल़ टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज खंडित न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळणार आहे़ (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांची दांडीपालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी बैठकीचे नियोजन केले होते़ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने सर्व विभागाचे प्रमुख फायलींचे गठ्ठे घेऊन हजर होते़ परंतु पालकमंत्री आलेच नाहीत़ तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावेकोपरगाव-६३श्रीरामपूर-५६राहाता-३६राहुरी-९नेवासा-३९नगर-९५पाथर्डी-५७काय आहे सवलतजमीन महसुलात सूटसहकारी कर्जाचे रुपांतरपरीक्षा शुल्कात माफीरोहयोअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलताशेती पंपाची वीज खंडित न करणे