श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील रस्ते, गटारी, बगीचा, मुख्याधिकारी निवासस्थान आदी कामांसाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. श्रीगोंद्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी श्रीगोंदा शहरासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले. शहरातील लहान रस्त्यांसाठी ४ कोटी, वाड्या, वस्त्यांच्या रस्त्यांसाठी ४ कोटी, उपनगरांच्या पाणीसाठ्यासाठी २ कोटी ५० लाख, नगरपालिका कार्यालयातील फर्निचर ९० लाख, वाड्या-वस्त्यांवरील रस्ते ३ कोटी ५० लाख, मुख्याधिकारी निवासस्थान व बगीचा १ कोटी ५० लाख, जलशुद्धीकरण प्रकल्प रस्ता ३ कोटी ५० लाख असा निधी मिळावा, अशी मागणी नगराध्यक्ष पोटे यांनी केली. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, मनोहर पोटे, बाळासाहेब महाडीक, बापूराव गोरे, एम. डी. शिंदे, मच्छिंद्र सुपेकर, नाना कोंथिबिरे, सतीश मखरे, सुनील वाळके आदी उपस्थित होते. श्रीगोंदा शहरासाठी निधी मंजूर होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
श्रीगोंद्याच्या विकासासाठी १८ कोटींचा निधी
By admin | Updated: August 10, 2016 00:24 IST