शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

१५ लाखांच्या खत विक्रीला बंदी

By admin | Updated: May 26, 2014 00:25 IST

अहमदनगर : कृषी विभागाकडून बियाणे आणि खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

अहमदनगर : कृषी विभागाकडून बियाणे आणि खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. असे असताना गतवर्षी कायद्यातील तरतुदींची अपूर्णता असणार्‍या १५ लाख ७७ हजार १४२ रुपये किमतीच्या खते विक्रीला बंदी घालण्यात आली होती. या खताचे वजन ३२२ मेट्रीक टन होते. कृषी निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणासाठी १९८३ पासून प्रत्येक जिल्हास्तरावर गुणवत्ता नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. यात १ पूर्णवेळ तर ४१ अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समितीत, कृषी उपसंचालक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या पथकाने केलेल्या कारवाईत बियाणांची गुणवत्ता तपासण्यासाठी ७८४ नमुने घेण्यात आले होते. यात २५ नमुने अप्रमाणित आढळलेले आहेत. यातील १२ नमुने कोर्टकेससाठी पात्र असून सहांवर कोर्टात खटले दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरित प्रशासकीय कारवाईसाठी वगळण्यात आलेले आहेत. १३ नमुन्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे. पाच नमुनांच्या बियाणांना विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची रक्कम ३ लाख रुपये आहे. रासायनिक खतांच्या तपासलेल्या नमुन्यांपैकी ३९ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत. त्यात २६ नमुन्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून १३ नमुन्यांविरोधात कोर्टात खटले दाखल करण्यात आलेले आहेत. ४७ प्रकरणी विक्रीबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या खतांची किंमत १५ लाख ७७ हजार रुपये आहे. किटकनाशकांचे २०२ नमुन्यापैकी अवघा एक नमुना अप्रमाणित घोषित करण्यात आलेला आहे. एका नमुन्याला विक्री बंदीचा आदेश देण्यात आलेला आहे. यंदा देखील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण समितीमार्फत खते, बियाणे आणि किटकनाशकांचे नमुने घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बियाणांचा काळाबाजार करणार्‍या ३ कृषी सेवा केंद्राचे, २ खते विक्री केंद्राचे आणि ३ किटकनाशक केंद्राचे परवाने कृषी विभागाने निलंबित के ले आहेत. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीकडे २२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याचे निराकरण करण्यात आलेले आहे.