शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

१ लाख ३० हजार नागरिकांनी केले कोरोनाला पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या दाेन महिन्यांपासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण संख्या आणि ५० ते ...

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या दाेन महिन्यांपासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण संख्या आणि ५० ते ६० जणांचे मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात काही सकारात्मकही घडले आहे. मागील १३ महिन्यांत १ लाख ३० हजार नागरिकांनी कोरोनाला हरवून दाखवले आहे. कोरोनावरील यशस्वी उपचार घेत हे रुग्ण घरी परतले. हे अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे यश आहे

नगरमध्ये १३ मार्च २०२० रोजी एका डॉक्टराला कोरोनाचे निदान झाले होते. हा नगर जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण होता. रुग्णालयात दाखल झाल्याच्या अवघ्या १४ दिवसांत डॉक्टर कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कोरोनाच्या प्रारंभी उपचाराच्या कोणत्याही बाबी स्पष्ट नव्हत्या, तरीही यशस्वी उपचार करून पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. कोरोनामुक्त होण्याचा आलेख वाढतच गेला. जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. आवघ्या तीन महिन्यांत ३२ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले. पण कोरोना रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले. रुग्णांच्या उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्र, खासगी रुग्णालये, महापालिकेचे कोविड केअर सेंटर, विविध सामाजिक संस्थांचे कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून दिवस-रात्र प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. त्यातूनच कोरोना मुक्त नागरिकांची संख्या सव्वा लाख झाली आहे.

.....

एकूण रुग्णसंख्या- १५६०१६

-एकूण मृत्यू- १७७६

- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या- १३०९३८

-उपचार घेत असलेले रुग्ण-२३३०२

......

कुठे किती कोरोनामुक्त

नगर शहर- ३५६४०

अकोले- ५६९७

जामखेड- ३७१९

कर्जत- ५३४९

कोपरगाव- ६६७३

नगर-८४३२

नेवासा-५३३५

पारनेर-५५४०

पाथर्डी-६८३८

राहाता-१०७२१

राहुरी- ५६९८

संगमनेर-१०५५६

शेवगाव-५०७०

श्रीगोंदा-४४९६

श्रीरामपूर-७०४९

भिंगार-२११३

सैनिक हॉस्पिटल- ६४६

...

जिल्ह्यातील स्थिती

कोरोनामुक्त- ८३. ९४ टक्के

मृत्युचे प्रमाण- १. १४ टक्के

...

एका आठवड्यातील

वारनिहाय कोरोनामुक्त

सोमवार- १९६८

मंगळवार-२६३१

बुधवार-२३८४

गुरुवार-३०६५

शुक्रवार-३०२३

शनिवार-३२२५

रविवार- ....