शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

क्व सुधा क्व कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:28 IST

कथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले.  घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने.

- डॉ. गोविंद काळेकथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले.  घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने. मग ती लाकूडतोड्याची गोष्ट असो वा आकाशातील चंद्राची मागणी करणाऱ्या रामाची असो अथवा खुलभर दुधाची कथा असो़ पंचतंत्राचा कर्ता विष्णुशर्मा हा बालमनाच्या लेखी फ ार मोठा लेखक होता़ पंचतंत्राबरोबर ‘हितोपदेश’ नाव घ्यावे लागते़ आकाशातील चंदामामापेक्षा दर महिन्याला हाती पडणाºया ‘चांदोबा’ मासिकाचे वेड बालमनाला अधिक होते़ त्यातील कथा आणि प्रसंगानुरूप चित्रे, नैतिकतेचे पाठ कळत-नकळत देऊन जात़ झाडावर लटकणाºया वेताळाची गोष्ट सुद्धा त्याला अपवाद नाही़हायस्कूलमध्ये एखाद्या विषयाचा शिक्षक गैरहजर असेल तर येणारा बदली शिक्षक शिकविण्यापेक्षा कथा सांगण्याचे काम उत्तम करी़ गणित, विज्ञान, इंग्रजी तासापेक्षा गोष्टीचा तास विद्यार्थ्यांना अधिक आनंद देऊन जाई़ साने गुरुजी कथामाला या गुरुजींच्या स्मरणार्थ निघालेल्या संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना बोलते केले. तसे हजारो विद्यार्थ्यांना ऐकते केले म्हणजे श्रोते बनविले़ कथा ध्येयवाद शिकविते तसे मनातील चांगुलपणाला खतपाणी घालते़ कथामालेचे कार्य अन्य संस्थांसाठी अनुकरणीय ठरावे़ चित्रपटाचे पेव आले आणि कथा गोष्टींनी मान टाकली़ चित्रपटातील स्टोरी सांगण्याचा आग्रह घरोघरी सुरू झाला़ कथा नीतिमूल्यांची रुजवण करत होती. स्टोरीला ते जमले नाही़ कथा गेली - संस्कारही लोप पावला़अष्टादश पुराणेषू ‘श्रीमद्भागवत’ पुराणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे़ आजही देशभरात ‘भागवत सप्ताह’ होताना दिसतात़ भागवत कथा म्हणजे अमृत कथा़ नव्हे अमृतापेक्षाही अधिक मौल्यवान मानली गेली आहे़ शुकमुनींची भागवत कथा ऐकण्यासाठी सर्व देव जमलेले आहेत़शुकं नत्वावदन् सर्वे स्वकार्यकुशला: सुरा:।कथासुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधाभिमाम्॥आपले ईप्सित साध्य करून घेणाºया देवांनी शुकमुनींना प्रणाम करून आम्ही अमृत आणले आहे ते आपण स्वीकारावे व आम्हाला भागवत कथेचे दान करावे़ आपल्या पूर्वजांनी प्रत्यक्ष अमृतापेक्षाही कथामृताला अधिक महत्त्व दिले आहे़ अमृतसेवनाने अमर होऊन राक्षसी कृत्ये करण्यापेक्षा कथामृताने भक्ती-करुणा निर्माण होऊन मानवतेचा धागा अधिक बळकट होईल असा विचार पूर्वज करते झाले़ कथासुधेच्या सेवनाने माणसाचे वर्तन आणि त्याचे अस्तित्व सर्व प्राणीमात्रांसाठी सुसह्य ठरावे ही कल्पना त्यामागे आहे़ राजा परिक्षिताला कथा सांगण्यासाठी शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत घेऊन आले़ देवांना ऐकावे लागले ‘क्व सुधा क्व कथा’ कुठे अमृत आणि कुठे कथा. अमृताहुनी गोड कथा तुझी देवा, असे गाणे नव्याने गावे लागेल़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक