शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्ग आणि नरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:30 IST

विश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायविश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय. वेगवेगळ्या धर्मांमध्ये या उपासना पध्दती व कार्यसंहिता वेगवेगळ्या असल्याने धर्माचारणाचे सुध्दा वेगवेगळे प्रकार सांगितले गेले आहेत. स्वर्ग आणि नरकाच्या परिकल्पनेत एक साम्य दिसून येते, ते हे की, स्वर्ग किंवा नरक मृत्यूनंतर प्राप्त होतात.परंतु काही भारतीय विचारवंतांच्या मते हे स्वर्ग व नरक या शरीरात किंवा या जगातच आहेत. योगशास्त्र, ज्ञानशास्त्र व संतसाहित्यात या विचारांचा प्रभाव दिसून येतो. या विचारधारेच्या लोकांचे असे मत आहे की, आपले विचार, वचन व कर्म आपल्यासाठी स्वर्ग किंवा नरक निर्माण करतात. स्वर्ग एक अशी जागा आहे, जिथे केवळ आनंद असतो, काही ठिकाणी स्वर्गाची कल्पना भोगांनी भरलेल्या जागेच्या रूपात केलेली आहे. हा आनंद किंवा सुखाचा उपभोग आपल्या विचारातून उत्पन्न होतो. सत्य आणि सकारात्मक विचार आपल्या मनात सकारात्मक कंपन निर्माण करतात, ज्यामुळे आपल्याला सुखद अनुभव मिळतो. हेच सकारात्मक विचार जेव्हा वाणीचे रूप धारण करतात तेव्हा मानव स्वत: सुखी होतो व तो दुसऱ्यांनाही सुख देतो. जेव्हा हे सकारात्मक विचार कर्माचे रूप धारण करतात तेव्हा जगात व व्यक्तिगत जीवनात सुखाचे आगमन होते व सुखद वातावरण निर्माण होते. खºया अर्थाने हाच स्वर्ग आहे.याउलट अशुध्द, नकारात्मक व विध्वंसात्मक विचार मानवाच्या मनात उत्तेजना व नकारात्मक कंपन निर्माण करतात. हे नकारात्मक विचार नकारात्मक वचनाच्या रूपात प्रकट होतात, जे स्वत:ला व दुसºयांनाही घातक ठरतात. या प्रकारचे विचार जेव्हा कर्माच्या रूपात प्रकट होतात तेव्हा जीवनात विध्वंस व नाश उत्पन्न करतात. वस्तुत: हाच नरक आहे.भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवत्गीतेमध्ये काम, क्रोध व लोभ या तीन गोष्टींना नरकाचे दार संबोधलेले आहे. काम, क्र ोध व लोभ हे सर्व अनर्थ व दुष्कृत्यांचे मूळ कारण आहे. या जगात होणाºया अपराधांचे जेव्हा आपण विश्लेषण करतो, तेव्हा असे लक्षात येते की या सर्व अपराधाचे मूळ कारणच हे काम, क्रोध व लोभ आहेत.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक