'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 04:07 PM2024-05-05T16:07:43+5:302024-05-05T16:25:09+5:30

hottest place in the world : जगभरातील असे अनेक देश आहेत, जिथे तापमान 70 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.

भारतासह जगभरातील अनेक देश उष्णतेने त्रस्त आहेत. भारतातील सर्वात उष्ण महिने मे आणि जून आहेत. याशिवाय, जगभरातील असे अनेक देश आहेत, जिथे तापमान 70 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया...

जगातील सर्वात उष्ण ठिकाणांबद्दल सांगायचे झाल्यास इराणमध्ये सर्वाधिक तापमान आहे. इराणमधील बंदर-ए-महशहर शहर हे जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. जुलै 2015 मध्ये या ठिकाणचे कमाल तापमान 74 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

जगातील सर्वात उष्ण ठिकाणांच्या यादीत आफ्रिकेतील सहारा वाळवंटाचे नाव देखील समाविष्ट आहे. सहारा वाळवंटात सरासरी तापमान 32 ते 42 अंश सेल्सिअस असते. एवढेच नाही तर वर्षभरात 100 मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो.

सुडानच्या वाडी हाल्फा शहरात पाऊस पडत नाही, येथील सरासरी तापमान नेहमीच 41 अंश सेल्सिअस असते. 1967 मध्ये येथे कमाल तापमान 53 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

याशिवाय, कॅलिफोर्नियामध्ये स्थित डेथ व्हॅली देखील जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक मानली जाते. 1913 मध्ये येथे कमाल तापमान 56.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

दरम्यान, अशा ठिकाणी सामान्य माणसाला राहणे अवघड आहे. या ठिकाणी असलेली उष्णता कोणालाही आजारी पाडण्यासाठी पुरेशी आहे.