विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 08:30 PM2024-05-18T20:30:38+5:302024-05-18T21:42:04+5:30

Swati Maliwal Assault Case : विभव कुमार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

swati maliwal assault case bibhav kumar arrested moved anticipatory bail in tis hazari court delhi | विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

नवी दिल्ली :  स्वाती मालीवाल गैरवर्तनप्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तीस हजारी न्यायालय म्हणाले की, विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे, असे अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीला आधीच अटक करण्यात आली आहे, त्यामुळे त्यावर सुनावणी करण्याचे कोणतेही औचित्य नाही. याचिका निष्प्रभ ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

विभव कुमार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. वकील एन हरिहरन म्हणाले की, आरोपांवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. विभव कुमार यांची सध्या काय स्थिती आहे हे आम्हाला माहीत नाही. तसेच, स्वाती मालीवाल जे आरोप करत आहेत ते समजण्यापलीकडचे आहेत. विभव कुमार असे अशी मारहाण कशासाठी करतील, हे समजण्यापलीकडचे आहे.

वकील एन हरिहरन म्हणाले, " स्वाती मालिवाल यांनी आरोप केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणीही असे कृत्य का करेल? तेथे शेकडो लोक उपस्थित होते, जर स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला झाला असता तर त्या ओरडल्या असत्या. तसेच, त्यांच्या आवाज तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी नक्कीच ऐकला असता. घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही होते. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आधी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे, मात्र स्वाती मालिवाल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या, हा थेट मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न आहे.

स्वाती मालीवाल प्रकरणात विभव कुमार यांना अटक
स्वाती मालीवाल यांच्यासोबत कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी (१८ मे) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले. विभव कुमार यांनी आपल्या वकिलामार्फत ३० हजार रुपयांच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे.

Web Title: swati maliwal assault case bibhav kumar arrested moved anticipatory bail in tis hazari court delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.