गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 02:19 PM2024-05-16T14:19:40+5:302024-05-16T14:24:27+5:30

अपघातांची संख्या वाढत चालली आहे. नजर हटी, दुर्घटना घटी हे प्रत्येक हायवेवर, रस्त्यावर वाहनांच्या मागे लिहिलेले असते. तरी देखील लोकांची नजर...

देशात वाहतुकीचे नियम खूप कठोर करण्यात आले आहेत. तरी देखील काही राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याने व चिरिमिरीमुळे हे नियम धाब्यावर बसविले जातात. यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. नजर हटी, दुर्घटना घटी हे प्रत्येक हायवेवर, रस्त्यावर वाहनांच्या मागे लिहिलेले असते. तरी देखील लोकांची नजर मोबाईलमध्ये डोकावतेच.

कारण काहीही असो, मॅप लावायचा होता, मॅप पाहत होतो, गाणी लावत होतो, फोन कुणाचा येतोय हे पाहत होतो अशी अनेक कारणे असतात. परंतु हीच कारणे अपघाताला कारणीभूत ठरतात. अनेक महाभाग तर फोनवर बोलत एका हाताने कार, दुचाकी हाकतात.

अशांना जरब बसविण्यासाठी २०१९ मध्ये नियमांत बदल करण्यात आले. दंडाची रक्कम अव्वाच्या सव्वा करण्यात आली. या नव्या नियमांनुसार वाहन चालविताना कोणत्याही कारणासाठी फोन वापरल्यास ५ ते १० हजार रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

असे लोक दिसले की पोलीस त्यांना थांबवितात व पावती फाडतात. पुन्हा पुन्हा हा गुन्हा केल्यास त्याचे लायसन ९० दिवसांसाठी सस्पेंड केले जाते.

मोबाईलच नाही हातात कागद किंवा अन्य कोणतीही वस्तू पकडली तरी तो गुन्हा आहे. वाहन चालविताना तुमचे दोन्ही हात स्टेअरिंगवरच असले पाहिजेत असा नियम आहे. फोन वापरण्यासाठी काही सूट देण्यात आली आहे.

रस्ता समजण्यासाठी ड्रायव्हर नेव्हिगेशन अॅप वापरू शकतो. तसेच फोन डॅशबोर्डवर ठेवू शकतो. ब्लूटूथचा देखील वापर करू शकतो. मात्र असे करताना त्याचे लक्ष पूर्णपणे हे रस्त्यावर असायला हवे. वाहन चालविताना खाने-पिणे देखील प्रतिबंधित आहे.