आयुष्य कमी करतात तुम्ही रोज खात असलेले 'हे' पदार्थ, लवकर मृत्यूचा वाढतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:53 PM2024-05-10T15:53:12+5:302024-05-10T16:10:54+5:30

या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरही कमी असतं. म्हणजे याचाच अर्थ असा की, या गोष्टींमधून शरीराला काहीच पोषण मिळत नाही.

आजकाल लोक सहजपणे वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. याला कारण चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. द बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित 30 वर्ष झालेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही पॅकेज्ड बेकरी फूड्स, स्नॅक्स, फिजी ड्रिंक्स, स्वीट सीरिअल आणि रेडी-टू-ईट किंवा हीट-इन फूड्सचं सेवन करत असाल तर या गोष्टी तुमचं आयुष्य कमी करत आहेत. अशात तुम्हाला अवेळी मृत्यूचा धोका वाढतो.

पॅकेज्ड फूडमध्ये अनेकदा कलर, इमल्सीफायर, फ्लेवर आणि इतर एडिटिव्स आढळतात. यात सामान्यपणे जास्त कॅलरी, एक्स्ट्रा शुगर, सॅचुरेटेड फॅट आणि मीठही जास्त असतं.

तसेच या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरही कमी असतं. म्हणजे याचाच अर्थ असा की, या गोष्टींमधून शरीराला काहीच पोषण मिळत नाही. उलट नुकसान होतं.

या गोष्टींच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला हृदयरोग आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.

रिसर्चमधून समोर आलं की, दिवसातून सरासरी 7 वेळा पॅकेज्ड फूड खाल्ल्याने एकूण मृत्यूचा 4 टक्के जास्त धोका असतो आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 9 टक्के जास्त राहतो.

रिसर्चमधून असंही आढळलं की, पॅकेज्ड मीट, चिकन आणि सीफूडपासून तयार रेडी-टू-ईट पदार्थ खाल्ल्याने मृत्यूचा धोका सगळ्यात जास्त वाढतो. त्याशिवाय शुगर, डेअरी उत्पादनांपासून बनवलेल्या मिठाई आणि पॅकेज्ड ब्रेकफास्ट फूडचा नंबर येतो.

अभ्यासकांनी सांगितलं की, हा रिसर्च या गोष्टीचं समर्थन करतो की, जास्त काळ निरोगी राहण्यासाठी आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी खासप्रकारच्या पॅकेज्ड फूडचं सेवन कमी केलं पाहिजे.