श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सर्वदमन बॅनर्जी आता कसे दिसतात-काय करतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:53 IST2020-08-11T16:43:10+5:302020-08-11T16:53:04+5:30
अशा कितीतरी मालिका आहेत ज्यातील कलाकार पुन्हा दिसले नाहीत. पण ते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशापैकी एक कलाकार म्हणजे होता ‘सर्वदमन डी बॅनर्जी’.

श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सर्वदमन बॅनर्जी आता कसे दिसतात-काय करतात?
सिने जगत ही एक मायानगरी मानली जाते. इथे रातोरात लोक स्टार होतात नाही तर इंडस्ट्रीतून बाहेर होतात. काही कलाकार तर एक-दोन सिनेमात दिसतात. पण त्यांचा चेहरा प्रेक्षक कधीही विसरत नाहीत. अशा कितीतरी मालिका आहेत ज्यातील कलाकार पुन्हा दिसले नाहीत. पण ते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशापैकी एक कलाकार म्हणजे होता ‘सर्वदमन डी बॅनर्जी’.
‘सर्वदमन डी बॅनर्जी’ यांनी ८०-९० च्या दशकात गाजलेल्या श्रीकृष्ण मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. दमदार आवाज आणि तेवढंच दमदार व्यक्तिमत्व असल्याने ही भूमिका लोकांच्या मनात घर करून गेली होती. आजही तो हसमुख चेहरा जसाच्या तसा आठवतो.
सर्वदमन डी बॅनर्जी यांनी ‘श्रीकृष्ण’, ‘अर्जुन’, ‘जय गंगा मैया’, ‘ओम नम: शिवाय’ या मालिका तसेच ‘स्वामी विवेकानंद', ‘स्वयं कृषि’, ‘आदि शंकराचार्य’ यासारखे धार्मिक कथानक असलेले सिनेमे देखील केले. पण यात सर्वात जास्त गाजला तो त्यांचा श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची एवढी लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी काही सिनेमे केले आणि हा कलाकार सिनेजगतातून अचानक गायब झाला.
आता सर्वदमन यांनी मनोरंजन विश्व मागे सोडलं. आता ते उत्तराखंड मधील ऋषिकेश इथं लोकांना मेडीटेशन शिकवण्याचं काम करतात. त्यांच्यानुसार ‘आयुष्यात एकवेळ अशी असते की जेव्हा तुम्हाला मनोरंजनाच्या जगतात पैसा आणि नाव हवं असतं. पण याही पलीकडे एक असं जग आहे, जिथे शांतता आहे आणि धावपळ नाही.’
आदि शंकराचार्य या सिनेमाला १९८३ मध्ये बेस्ट फीचर फिल्मचा नॅशनल अवॉर्डही मिळाला होता. तसेच ते सुशांत सिंह राजपूतच्या एम.एस. धोनी सिनेमातही बघायला मिळाले होते. पण आता ते नदी आणि डोंगरांमधील स्वर्गीय वातावरणात आपलं मेडीटेशन सेंटर चालवतात.
वर्षा उसगावकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एंट्री !
अखेर तो क्षण लवकरच येणार, दयाबेनची दणक्यात एन्ट्री होणार!
"500 साल के संघर्ष के बाद"...हातात पणती घेत रामायणच्या 'सीते'ने व्यक्त केला आनंद