'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिके मधील 'दया भाभी' म्हणजेच दिशा वाकाणीने शो सोडल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. दीशा पुन्हा कधी झळकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले होते. मध्यंतरी दया बेन झळकणार असल्याच्या चर्चा सुरू होती. पण त्या केवळ चर्चाच ठरल्या. पुन्हा एकदा मलिकेच्या निर्मात्यांनी दया बेनला मालिकेत आणण्याचा घाट घातला आहे. देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार मनोरंजनसृष्टीलाही लागलेला ब्रेक आता पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे. नवीन जल्लोषात पुन्हा एकदा 'तारक मेहता' मालिकाही नवीन भागांसह रसिकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. 

रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन गोष्टी मालिकेत आणत रंगत वाढवली जाणार आहे. दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये काम करतेय. त्यामुळे मालिकेची धडकन असेलली दया बेनपासून चाहते आणखीन वंचित राहू नये म्हणून मालिकेत दीशा अर्थात दया येणार असल्याची चाहत्यांना खुश खबर देण्यात आली आहे. प्रोडक्शन हाउसला माहिती आहे की, दिशाची मुलगी खुप लहान आहे आणि तिला मुलीला जास्त वेळ द्यायचा आहे. तरीही दिशाला पुन्हा शो जॉइन करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु  होते. आजही  करिअरपेक्षा पर्सनल लाइफवर फोकस करणात असली तरीही दिशा नेमकी कधी आणि केव्हा रसिकांच्या भेटीला येणार हे अजून तरी गुलदत्यातच आहे.

तसेच ‘तारक मेहता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने निर्माता असित मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीत दयाबेन या व्यक्तिरेखेबाबत मोठे वक्तव्य केले होते. मालिकेत दिशा वकानी पुन्हा आली तर ठिक नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.  दया बेन नसतानाही गेल्या अडीच वर्षांपासून मालिका सुरु आहे. पण मालिकेच्या टीआरपीवर काहीही परिणाम झालेला नाही. प्रेक्षक आमच्यावर आजही तितकेच भरभरुन प्रेम करत आहेत. एका व्यक्तीमुळे नव्हे तर संपूर्ण टीममुळे कुठलीही मालिका चालते. आमची टीम खूप चांगले काम करत आहे. गेल्या अडीच वर्षात दिशा वकानीची कमतरता आम्हाला बिलकूल भासली नाही असे त्यांनी म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Daya Ben aka disha vakani is coming back to taarak mehta ka Ulta Chashma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.