छोटया पडद्यावरील विवादीत रिअॅलिटी शो बिग बॉस 13 रविवारपासून आपल्या भेटीला येणार आहे. या शोला होस्ट सलमान खान करणार आहे. बिग बॉसच्या घरात यंदा कोणकोण जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार तारा फ्रॉम सितारामधील मुख्य कलाकार अश्विनी कौलने आपली मालिका सोडत आहे. 


गेल्या एक महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अशातच मुख्य भूमिका असलेल्या अश्विनी कौलने मालिका सोडणं मेकर्ससाठी धोक्याची घंटा ठरु शकते. रिपोर्टनुसार अभिनेत्या शोच्या स्टोरीलाईनवरून खुश नव्हता. त्याला बिग बॉसच्या घरात जाण्याची ऑफर आली आणि त्यांने लगेच होकार दिला. रिपोर्टनुसार या सीझनमध्ये रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, देवोलीना भट्टाचार्जी, दयानंद शेट्टी, कोएना मित्रा व दलजीत कौर यांच्यासारखे बरेच कलाकार बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहेत.

बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी रश्मी देसाईने बाकीच्या स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन देण्यात आलं आहे. असं वृत्त आहे की रश्मी बॉयफ्रेंड अरहान खानसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. या घरात जाण्यासाठी रश्मीने १.२ कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्रीची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी शोचे मनोरंजन वाढवण्यासाठी बिग बॉस 13च्या घरात सहभागी केलं आहे.

बिग बॉसच्या बाराव्या सीझनला प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे यावेळी शोमध्ये बदल करण्यात आला आहे.  बिग बॉसचा १३ येत्या शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे आणि इतर दिवशी रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांना हा शो पहाता येणार आहे.
 


Web Title: Tara from satara star ashwini koul quit to participate in bigg boss 13
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.