Shocking! television artist files rape, complaint filed over Junior artist | धक्कादायक! टेलिव्हिजन आर्टिस्टवर ज्युनिअर आर्टिस्टने केला बलात्कार, तक्रार दाखल
धक्कादायक! टेलिव्हिजन आर्टिस्टवर ज्युनिअर आर्टिस्टने केला बलात्कार, तक्रार दाखल

कहानी घर घर की, देश में निकला होगा चाँद व नच बलिये सारख्या मालिका व शोजमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने हरियाणातील यमुनानगर येथे राहणाऱ्या ज्युनिअर आर्टिस्टवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही अभिनेत्री मुंबईत राहते. ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्याने जबाबदारी घेण्यास नकार देत फसविल्याचा आरोप तिने केला आहे.


आज तकच्या रिपोर्टनुसार, या अभिनेत्रीनं बऱ्याच मालिकेत काम केलं आहे. तिची मैत्री यमुनानगरमधील एका ज्युनिअर आर्टिस्टसोबत झाली आणि गेल्या महिन्यात १३ ऑक्टोबरला यमुनानगरच्या एका हॉटेलमध्ये ते दोघे थांबले होते. त्यावेळी ज्युनिअर आर्टिस्ट विनीतने नशा असणारे पदार्थ खायला घालून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे.
त्यानंतर ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर तिने त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. परंतु, त्याने लग्नासाठी नकार दिला. शेवटी पीडित अभिनेत्रीनं यमुनानगर पोलिस स्टेशममध्ये विनीत व त्याच्या कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखल केली. तसेच तिने या संपूर्ण प्रकरणात विनितसोबत त्याच्या कुटुंबाचीदेखील साथ असल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनीत व टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीची ओळख मुंबईतील एका कामादरम्यान झाली होती. तिने 'कहानी घर घर की', 'देश में निकला होगा चांद' व 'नच बलिये' मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच त्याच्या घरातल्यांचीही चौकशी करणार आहे. पोलिसांनी त्या तरूण व त्याच्या कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली असून तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस पीडित अभिनेत्रीसोबतही चौकशी करणार आहेत.

Web Title: Shocking! television artist files rape, complaint filed over Junior artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.