A R Rahman makes a grand comeback on The Voice! | 'द व्हॉइस'मध्ये ए. आर. रेहमान यांचे दणक्यात पुनरागमन
'द व्हॉइस'मध्ये ए. आर. रेहमान यांचे दणक्यात पुनरागमन


स्टार प्लसवरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाचे सुपरगुरूच्या रूपात नामवंत संगीतकार ए. आर. रेहमान हे एक अविभाज्य अंग बनले आहेत. हा कार्यक्रम अंतिम फेरीच्या दिशेने सरकत असल्याने सुपरगुरू रेहमान यांनी अंतिम स्पर्धकांच्या निवडीसाठी आता या कार्यक्रमात भव्य पुनरागमन केले आहे. या कार्यक्रमातील अदनान सामी, हर्षदीप कौर, कनिका कपूर आणि अरमान मलिक या अन्य प्रशिक्षकांनी सुपरगुरूच्या खुर्चीत रेहमान यांना बसलेले पाहिल्यावर आपला आनंद व्यक्त केला.

 
गेले काही भाग रेहमान या कार्यक्रमात नसल्याने आपल्याला त्यांची उणीव जाणवत असल्याचे मतही या प्रशिक्षकांनी व्यक्त केले. सुपरगुरूची भूमिका पार पाडण्यास आपण पुन्हा तयार असल्याचे यावेळी रेहमान म्हणाले.

या कार्यक्रमाशी जवळचा संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “रेहमान यांना या कार्यक्रमात पुन्हा परतल्याचे पाहून प्रशिक्षक आणि स्पर्धकांनी एकच जल्लोष केला. आपल्याला रेहमान यांची किती आठवण येत होती, ते या प्रशिक्षकांनी सांगितले आणि स्पर्धकांनी रेहमान यांची गाजलेली गाणी गाऊन त्यांना सुरेल भावांजली वाहिली. आपल्यावर केलेल्या या प्रेमाच्या वर्षावाने ए. आर. रेहमान भारावून गेल्याचे दिसले. त्यानंतर ते स्वत:च आपली हम्मा हम्मा, उर्वशी आणि जाने तू या जाने ना ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी मंचावर आले. त्यांच्या या कृतीमुळे सेटवर आणि कार्यक्रमातील वातावरणात उत्साह संचारला. भारताच्या या सर्वात लोकप्रिय संगीतकाराच्या या कामगिरीने प्रेक्षक, प्रशिक्षक आणि स्पर्धक भारावून गेले.”


आता सुपरगुरू ए. आर. रेहमान या कार्यक्रमात परतल्याने आणि कार्यक्रमाने उपान्त्य फेरीत प्रवेश केल्याने ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाचे प्रेक्षक उत्साहित झाले आहेत.


Web Title: A R Rahman makes a grand comeback on The Voice!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.