Video: निरागसतेमुळे परीने जिंकलं नेटकऱ्यांचं मनं; पाहा शूटिंगच्या गडबडीतील मायराची मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 18:17 IST2022-03-13T18:14:17+5:302022-03-13T18:17:30+5:30

Myra vaikul : सेटवरच्या गडबड गोंधळात मायरा एकटीच तिच्या विश्वात रममाण झाली आहे. मायरा मस्तपैकी या गडबड गोंधळात तिचं बालपण एन्जॉय करत आहे.

marathi tv show mazi tuzi reshimgath childartist pari aka myra vaikul video viral | Video: निरागसतेमुळे परीने जिंकलं नेटकऱ्यांचं मनं; पाहा शूटिंगच्या गडबडीतील मायराची मस्ती

Video: निरागसतेमुळे परीने जिंकलं नेटकऱ्यांचं मनं; पाहा शूटिंगच्या गडबडीतील मायराची मस्ती

उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील निरागस भाव यांच्यामुळे प्रेक्षकांची अल्पावधीत मनं जिंकणारी बालकलाकार म्हणजे मायरा वायकूळ (myra vaikul). 'माझी तुझी रेशीमगा'ठ या मालिकेच्या माध्यमातून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे मायराने अगदी सुरुवातीच्या एक- दोन भागांमध्येच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे इतक्या कमी वयात तिचा जबदस्त फॅन फॉलोविंग तयार झाला आहे.

कलाविश्वाप्रमाणेच मायरा सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर पाहायला मिळतात. यामध्येच सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मायरा दिवसभर सेटवर काय करते हे दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेटवर रंगपंचमीच्या भागाची तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सगळे जण शूटच्या गडबडीत आहे. मात्र, एकटी मायरा तिच्या विश्वात रममाण झाली आहे. मायरा मस्तपैकी या गडबड गोंधळात तिचं बालपण एन्जॉय करत आहे. ती सेटवर एकटीच नाचताना, बागडताना दिसत आहे.  सध्या मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या निरागसतेचं कौतुक केलं आहे.
 

Web Title: marathi tv show mazi tuzi reshimgath childartist pari aka myra vaikul video viral