Video: कोळी गाण्यावर संजनाने धरला ठेका; पाहा रुपाली भोसलेचा जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:18 IST2021-10-03T17:16:29+5:302021-10-03T17:18:08+5:30
Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या रुपाली महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.

Video: कोळी गाण्यावर संजनाने धरला ठेका; पाहा रुपाली भोसलेचा जबरदस्त डान्स
नकारात्मक भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या रुपाली महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. या मालिकेत रुपाली संजना या भूमिकेत पाहायला मिळत आहे. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या रुपालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी संजनाने बापाच्या आगमनासाठी खास पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. विशेष म्हणजे या भागाचं चित्रीकरण झाल्यानंतर रुपालीने मेकअप रुममध्ये कोळी गाण्यावर भन्नाट डान्स केला.
Mumbai Cruise Drugs Bust: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान घेतोय 'या' वकिलाची मदत
रुपालीने वाकटीच्या हळदीला गेलतो घरा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, रुपाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात बऱ्याचवेळा ती काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.