Prarthana Behere : प्रार्थना बेहरेला लंडनमध्ये रिल शूट करणं पडलं महागात, पाहा नेमकं झालं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 03:20 PM2022-05-18T15:20:40+5:302022-05-18T15:21:31+5:30

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थना बेहरे (Prarthana Behere ) सध्या कुठे आहे तर लंडनमध्ये पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. लंडन हॉलिडे म्हटल्यावर तिथले फोटो, व्हिडीओ शेअर होणारच... पण हे काय?

marathi actress prarthana behere met an accident IN london shares funny video | Prarthana Behere : प्रार्थना बेहरेला लंडनमध्ये रिल शूट करणं पडलं महागात, पाहा नेमकं झालं तरी काय?

Prarthana Behere : प्रार्थना बेहरेला लंडनमध्ये रिल शूट करणं पडलं महागात, पाहा नेमकं झालं तरी काय?

googlenewsNext

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थना बेहरे (Prarthana Behere ) सध्या कुठे आहे तर लंडनमध्ये पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. लंडन हॉलिडे म्हटल्यावर तिथले फोटो, व्हिडीओ शेअर होणारच. लंडनमधील भटकंतीदरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो प्रार्थनाने शेअर केले आहेत. पण हे काय? एक रिल व्हिडीओ बनवणं मात्र तिला चांगलंच महागात पडलं. होय, रिल बनवण्याच्या नादात कपाळावर टेंगुळ आलं ना राव!!
नेमकं काय घडलं? हे पाहण्यासाठी तुम्हाला बातमीसोबतचा व्हिडीओ पाहावा लागेल. या व्हिडीओत प्रार्थना  स्वत:च स्वत:चा व्हिडीओ शूट करताना दिसते.  पण हे करत असताना चक्क मोबाईल तिच्या डोक्यावर पडतो आणि कपाळावर भलंमोठं टेंगुळ येतं. व्हिडीओ ती थंड पाण्याच्या बाटलीनं ती कपाळ शेकवताना दिसत आहे.

टेंगुळ ऑन माय फोरहेड, असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. ‘हा हा हा... प्रार्थना अंग काय तू’ असं एकाने लिहिलं आहे. याला म्हणतात, नसताना पण कपाळात जाणे.., अशी कमेंट एका युजरने केली आहे. अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याची विनंती केली आहे.

प्रार्थना सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहाची भूमिका साकारते आहे.  प्रार्थना मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. यापूर्वी तिने अनेक   चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. टेलिव्हिजनवरून प्रार्थनाने तिच्या करिअरची सुरुवात केली आहे.

तिचा नवरा अभिषेक जावकरचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. तो लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचं वितरण केलं आहे. मूळ  सिंघम चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली.

Web Title: marathi actress prarthana behere met an accident IN london shares funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.