हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 02:21 PM2021-09-17T14:21:34+5:302021-09-17T14:22:55+5:30

Sameer chougule: एका चाहत्याने समीरला थेट त्याच्या केसांवरुन प्रश्न विचारला आहे. हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? असा प्रश्न या चाहत्याने विचारला.

marathi actor sameer chougule fan asking this question about his hair transplant | हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न

हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न

Next
ठळक मुद्देहेअर ट्रान्सप्लांटसाठी समीरला मोजावे लागले लाखो रुपये

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. त्यामुळेच अनेक चाहते त्याला थेट काही प्रश्न विचारत असतात. असाच एक थेट पण भलताच प्रश्न एका  चाहत्याने समीरला विचारला आहे.

अलिकडेच समीर चौगुलेने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चाहत्यांना त्याच्याविषयी पडलेले प्रश्न विचारण्यात आले होते. विशेष म्हणजे एका चाहत्याने समीरला थेट त्याच्या केसांवरुन प्रश्न विचारला आहे. हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला असा प्रश्न या चाहत्याने विचारला. मात्र, समीरने हा प्रश्न पॉझिटिव्हरित्या घेत या चाहत्याला प्रामाणिकपणे उत्तर दिलं आहे.

बोल्डनेसची हद्दपार! सलमानच्या भाचीचे हॉट फोटो व्हायरल

"हा खरंच तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारला आहे. लोकांच्या मनात मी पॉझिटिव्हीटी निर्माण करतोय. लोकांना निदान माझ्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करावंस वाटतं हादेखील एक पॉझिटिव्ह भाग आहे. आता माझी काय हेअर ट्रान्सप्लांट करण्याची एजन्सी नाही. त्यामुळे मी काही ठराविक रक्कम सांगू शकत नाही. पण, मला साधारणपणे ३ लाखांपर्यंत खर्च आला.आता सध्या हेअर ट्रान्सप्लांट करणं स्वस्त झालं आहे. पण, आताची किंमत मला माहित नाही", असं समीर म्हणाला.

हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

दरम्यान, यापूर्वीदेखील झालेल्या मुलाखींमध्ये समीरने त्याला आलेल्या चाहत्यांचे भन्नाट अनुभव शेअर केले आहेत. समीर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये काम करत असून हा कार्यक्रम आता आठवड्यातून चार वेळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Web Title: marathi actor sameer chougule fan asking this question about his hair transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app