'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:08 PM2022-03-31T19:08:10+5:302022-03-31T19:09:10+5:30

'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये ‘जर्सी’(Jersey) चित्रपटाचे कलाकार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हजेरी लावली आहे.

Gudi padva to celebrate demolition crew with 'Jersey' cast in 'India's Got Talent'! | 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

googlenewsNext

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज गॉट टॅलेंट (India's Got Talent) हा टॅलेंट रियालिटी शोने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोमध्ये ‘जर्सी’ (Jersey Movie) चित्रपटाचे कलाकार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हजेरी लावली आहे. या शोमधील स्पर्धक त्यांच्यासह गुढी पाडव्याचा मंगलमय सण साजरा करणार आहे. एकापेक्षा एक जबरदस्त अॅक्ट्स स्पर्धकांनी सादर केले. त्यात, मुंबईच्या डिमॉलिशन क्रूच्या सदस्यांनी त्यांचा अॅक्ट मुंबईची लाईफ लाइन असलेल्या डब्बेवाल्यांना समर्पित केला. त्यांनी ‘फटा पोस्टर निकला हीरो’ चित्रपटातील ‘धतिंग नाच’ गाण्यावर काही दमदार मूव्ह्ज केल्या.

सेटवरील सर्व उपस्थितांना आश्चर्याचा धक्का देत, या क्रू मधली मराठी मुले खर्‍याखुर्‍या डब्बेवाल्यांना आणि जर्सी चित्रपटाची अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मंचावर आमंत्रित करताना दिसतील.

स्वतः मराठी असलेली मृणाल आपल्याला गुढी पाडवा हा सण किती आवडतो आणि आपल्या घरी आपण गुढी कशी सुशोभित करते याविषयी सांगताना दिसणार आहे. मृणाल डिमॉलिशन क्रू आणि डबेवाल्यांसह मंचावर जाऊन गुढीची पूजा देखील करणार आहे. सेटवर हजर असलेल्या लोकांसाठी ते एक लोभस दृश्य असेल! 
इंडियाज गॉट टॅलेंट, या शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारीत होते.

Web Title: Gudi padva to celebrate demolition crew with 'Jersey' cast in 'India's Got Talent'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.