Bigg Boss 3: बोल्ड परफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या मिनल शाहच्या आई-वडिलांचा झालाय घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:10 IST2021-09-20T16:09:07+5:302021-09-20T16:10:46+5:30
Bigg boss marathi 3: मिनलची आई मराठी असून तिचे वडील गुजराती आहेत. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले आहेत.

Bigg Boss 3: बोल्ड परफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या मिनल शाहच्या आई-वडिलांचा झालाय घटस्फोट
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत असून मिनल शाह या सेलिब्रिटी स्पर्धकाची जोरदार चर्चा सुरु आहे. शाह अडनाव असललेली मिनल मराठमोळी कशी असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, नुकतीच एका मुलाखतीत मिनलने तिच्याविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यामध्येच तिने तिच्या आई-वडिलाचा घटस्फोटदेखील झाल्याचं सांगितलं आहे.
मुंबईत लहानाची मोठी झालेल्या मिनलचं शालेय शिक्षण वांद्रे पूर्वमधील आयईएस न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. मराठीत शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या मिनलची आई मराठी असून तिचे वडील गुजराती आहेत. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले आहेत.
'या' कालाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर
"मी लहान असतानाचा माझे आई-वडील विभक्त झाले. तेव्हापासून मी आणि माझा भाऊ माझ्या आईसोबतच राहतोय. माझे वडील गुजराती असले तरीदेखील माझी आई मराठी आहे. त्यामुळे आमच्यावर लहानपणापासून मराठीतच सगळे संस्कार झाले. मुंबईतील एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला आहे",असं मिनल म्हणाली.
दरम्यान, मिनल ही एमटीव्ही रोडीज स्टार असून, तिने अनेक कठीण स्टंट करून सेमीफायनल मध्ये जागा मिळवली होती. त्यामुळे बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरात मिनल काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.