Bigg Boss Marathi 3, Episodes, 25 Nov : 'माऊलींचं नाव घेणं आजपासून सोडून दे'; विकास-विशालमध्ये झाली मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:25 PM2021-11-25T14:25:14+5:302021-11-25T14:25:36+5:30

Bigg boss marathi 3: या दोघांचा वाद इथवरच थांबत नाही. हा वाद प्रचंड विकोपाला जातो. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

bigg boss marathi 3 episodes 25 nov vishal and vikas task fight | Bigg Boss Marathi 3, Episodes, 25 Nov : 'माऊलींचं नाव घेणं आजपासून सोडून दे'; विकास-विशालमध्ये झाली मारामारी

Bigg Boss Marathi 3, Episodes, 25 Nov : 'माऊलींचं नाव घेणं आजपासून सोडून दे'; विकास-विशालमध्ये झाली मारामारी

googlenewsNext

सध्या छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या शोचं तिसरं पर्व सुरु आहे. या घरात गेल्या महिन्याभरापासून अनेक सेलिब्रिटी एकत्र राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यात मैत्री, वादविवाद असं सारं काही पाहायला मिळतं. यामध्येच या घरात पहिल्या दिवसापासून विकास पाटील (vikas patil) आणि विशाल निकम  (vishal nikam) या दोघांची मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सध्या ही जोडी बिग बॉसच्या घरातील जय-विरु असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, जसजसा टास्क रंगत आहे आणि हा शो पुढे जात आहे तसतसं या दोघांमधील वाद वाढतांना दिसत आहे. आजही या घरात असंच काहीसं होणार आहे. 

आज बिग बॉसच्या घरात नवीन कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. या कार्यात विकास-विशालमध्ये हाणामारी होणार आहे.  कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दोघांमध्ये होत असलेली मारामारी दिसून येत आहे.


 
"स्वत:ची वेळ आली तेव्हा हे करतो आहेस काल अका नाही केलं मग ? जय आणि उत्कर्ष होता म्हणून घाबरलास ?", असा प्रश्न विकास विशालला विचारतो. त्यावर "तुझ्यात हिंमत आहे का ? तू एक नंबरचा फट्टू आहेस..", असं विशाल म्हणतो.

दरम्यान, "मी डोक्याने खेळतो.. तू माऊलींचं नाव घेतोस ना मग आजपासून ते सोडून दे", असं विकास रागाने म्हणतो. परंतु, या दोघांचा वाद इथवरच थांबत नाही. हा वाद प्रचंड विकोपाला जातो. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 3 episodes 25 nov vishal and vikas task fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.