Bigg Boss Marathi 2: Birthday party at Bigg Boss house today | Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात आज बर्थडे पार्टी, बिचुकले थिरकणारेत या गाण्यावर
Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात आज बर्थडे पार्टी, बिचुकले थिरकणारेत या गाण्यावर


बिग बॉस मराठी सीझन २ च्या सदस्यांचा आता शेवटच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला आहे. काल घरामध्ये टिकीट टू फिनाले यासाठी कार्य रंगले होते जे सदस्यांच्या चुकीमुळे रद्द करण्यात आले.

 

पहिल्या फेरीमध्ये आरोह आणि दुसर्‍या फेरीमध्ये शिव बाहेर पडला. किशोरी शहाणे आणि वीणा जगताप या दोघींपैकी कोणता सदस्य टिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी पात्र आहे याचा निर्णय सदस्य एकमताने घेऊ न शकल्याने ते कार्य  बिग बॉस यांनी अनिर्णीत ठेवले आणि रद्द केले.

शिवानी सोडून सर्व सदस्य वीणाच्या बाजूनं होते. बिग बॉस यांनी काल झाल्या प्रकारावरून सगळ्याच सदस्यांची शाळा घेतली. आता किशोरी, आरोह, वीणा आणि किशोरी हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.


आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये धम्माल मस्ती होणार आहे. नाच, गाणी, सगळे सदस्य मिळून धिंगाणा घालणार हे नक्की ! कारण आज बिग बॉस सदस्यांवर “BB बर्थडे पार्टी” हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये बिचुकलेंचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे. बिचुकले आज “आया है राजा” या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत.

तेव्हा बघायला विसरू नका ही धम्माल मस्ती आजच्या बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Birthday party at Bigg Boss house today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.