ठळक मुद्देपहिल्‍याच दिवशी मला कॅमेऱ्यासमोर सगळे कपडे काढून कोंबडा करून उभा केले होते. त्या अवस्थेत मला काही लोक मारतात असे ते दृश्य होते. अंडरवेअरवर होतो मी, लिटरली व्‍ही शेप प्रॉपर अंडरवेअर, ते ही पूर्ण दिवस!

बिग बॉस घरातील स्‍पर्धक नेहमीच फावल्या वेळात कार्यक्रमातील इतर स्पर्धकांना आपल्या आयुष्यातील काही अनोखे अनुभव सांगताना दिसतात. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आरोह वेलणकर हिना पांचाळला 'रेगे' चित्रपटाच्‍या पहिल्‍या दिवसाच्‍या शूटिंगच्या आठवणीविषयी सांगताना दिसत आहे. 

जुन्‍या आठवणींमध्‍ये रमत आरोह सांगतो, ''माझी पहिली फिल्‍म 'रेगे' खूप हिट झाली होती. त्‍या फिल्‍मचा पहिलाच दिवस म्हणजेच माझ्या आयुष्‍यातला शूटिंगचा पहिला दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. पहिलाच सीन असा होता की, मला रिमांडमध्‍ये अंडरवेअरवर ठेवलं आहे आणि मला प्रचंड टॉर्चर करत आहेत!'' हे ऐकल्‍यानंतर हिनाला हसू येते.  

त्यावर आरोह पुढे सांगतो, ''पहिल्‍याच दिवशी मला कॅमेऱ्यासमोर सगळे कपडे काढून कोंबडा करून उभा केले होते. त्या अवस्थेत मला काही लोक मारतात असे ते दृश्य होते. अंडरवेअरवर होतो मी, लिटरली व्‍ही शेप प्रॉपर अंडरवेअर, ते ही पूर्ण दिवस!'' हिना अचंबित होऊन चौकशी करते, ''तेव्‍हा तू रिलेशनमध्‍ये होतास ना, लग्‍न झालं नव्‍हतं ना? आणि रेगे नंतर कोणत्या चित्रपटांमध्ये तू काम केलेस? यावर आरोह सांगतो, ''माझं लग्न ११ डिसेंबर २०१७ ला झालं... दोन वर्ष होतील या डिसेंबरमध्‍ये. मी तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसऱ्या चित्रपटात शिवानी हिरोईन होती माझी.'' 

आरोह त्‍याच्‍या पहिल्‍या चित्रपटानंतर त्‍याच्‍यामध्‍ये झालेल्‍या बदलाबाबत सांगतो आणि पदार्पणासाठी त्‍याला मिळालेल्‍या प्रतिष्ठित पुरस्‍काराबाबत देखील सांगतो. तो म्‍हणतो, ''मी जेव्‍हा मराठी इंडस्‍ट्रीमध्‍ये आलो तेव्‍हा मी बिलकुल गुड लुकिंग नव्‍हतो, खूप सुकडा होतो. बहुधा त्यामुळेच घेतलं होतं मला रेगेमध्‍ये. २०१३ मध्‍ये मी केवळ ५२ किलोचा होतो. त्‍यानंतर मग मी वजन वाढवले. रेगे चित्रपट खूप हिट झाला होता. त्‍यावर्षी तीनच हिट फिल्‍म्‍स होत्‍या. एक 'रेगे', दुसरी 'लय भारी' आणि तिसरी 'टाइमपास'. मला आणि रितेश देशमुखला फिल्‍मफेअरमध्‍ये नॉमिनेशन होतं बेस्‍ट डेब्‍यू इन मराठीसाठी. तो पुरस्कार रितेशला मिळाला. पण मला पदार्पणासाठी दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला होता.'' 

Web Title: Bigg Boss Marathi 2 : bigg boss marathi 2 contestant Aroh welankar told about his first movie rege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.