ठळक मुद्देअभिजीत बिचुकले शिव ठाकरे आणि वैशाली माडेसोबत गप्पा मारताना दिसत आहे. गप्पांच्या ओघात तो या दोघांना सांगतो की, त्याला हस्‍तरेखा पाहून भविष्‍य सांगता येते. हे ऐकून शिव उत्‍सुक होतो आणि बिचुकलेला त्‍याच्‍या हस्‍तरेखा वाचण्‍यासाठी सांगतो.

'बिग बॉस मराठी'चे घर हे अत्‍यंत अनपेक्षित आहे आणि तेथील स्‍पर्धक काय करू शकतात हे कोणी काहीच सांगू शकत नाही. या घरात प्रवेश केल्यापासून प्रत्येकजण या कार्यक्रमात टिकून राहाण्यासाठी आपल्यापरिने प्रयत्न करत असतो. बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. पण त्यातही अभिजीत बिचुकलेला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरात आता अभिजीत बिचुकले एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तो आता घरातील स्‍पर्धकांचे आता भविष्‍य सांगायला लागला आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये अभिजीत बिचुकले शिव ठाकरे आणि वैशाली माडेसोबत गप्पा मारताना दिसत आहे. गप्पांच्या ओघात तो या दोघांना सांगतो की, त्याला हस्‍तरेखा पाहून भविष्‍य सांगता येते. हे ऐकून शिव उत्‍सुक होतो आणि बिचुकलेला त्‍याच्‍या हस्‍तरेखा वाचण्‍यासाठी सांगतो.

शिवचा हात पाहून बिचुकले म्‍हणाला की, ''तुला पैसा खूप आवडतो आणि पोरींचा पण तुला नाद आहे. पण तू ते दाखवत नाहीस'.' आणि पुढे विचारतो, ''तू पोलिस किंवा मिलिटरीमध्‍ये जायचा विचार केला होतास का?'' शिव या अंदाजाला नकार देतो आणि म्‍हणतो, ''नाही, मी बॉडी बनवली म्‍हणून तुम्‍ही उगाचच अंदाज लावू नका... उगाचच फेकत आहात तुम्ही!'' शिव हे बोलताच तिघेही जोरजोरात हसू लागतात. यावर बिचुकले म्‍हणतो, ''डान्‍स डायरेक्‍शनचं काम कर... त्‍यात भविष्‍य आहे तुझं'' तसेच आणखी पुढे म्‍हणतो, ''कला क्षेत्रात आहे भविष्‍य तुझं''. 

हस्‍तरेखा वाचण्‍याचे सत्र येथेच थांबत नाही. शिव वीणाकडे जातो. शिव तिला विचारतो, ''लहानपणी कधी डोक्‍यावर पडली आहेस का?'' आणि वीणा त्‍याला हो म्‍हणून प्रत्‍युत्‍तर देते! 

शिव तिला आणखी चिडवत म्‍हणतो, ''तिथेच सगळा प्रोब्‍लेम झाला आहे आणि तुला बिग बॉस हाऊसमध्‍ये कुठला क्‍यूट आणि हँडसम मुलगा भेटला आहे का?'' तो स्‍वत:बद्दलच बोलत आहे हे वीणाला कळत असले तरी ती ते दाखवत नाही आणि त्‍याच्‍या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. 


Web Title: Abhijit bichkule becomes astrologer in Bigg boss marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.