Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलं तर पाणी प्या, आचार्य बाळकृष्ण यांचा सल्ला-उपाशीपोटी ‘हा’ पदार्थ पाण्यात घालून प्या..

पोट सुटलं तर पाणी प्या, आचार्य बाळकृष्ण यांचा सल्ला-उपाशीपोटी ‘हा’ पदार्थ पाण्यात घालून प्या..

Weight Loss Tips By Acharya Balkrishna : आचार्य बाळकृष्ण यांनी ज्या पदार्थाबाबत सांगितले आहे तो म्हणजे अश्वगंधा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:54 IST2026-05-08T16:48:15+5:302026-05-08T16:54:44+5:30

Weight Loss Tips By Acharya Balkrishna : आचार्य बाळकृष्ण यांनी ज्या पदार्थाबाबत सांगितले आहे तो म्हणजे अश्वगंधा.

Weight Loss Tips By Acharya Balkrishna Acharya Balkrishna Told The Ayurvedic Method Of Belly Fat Loss | पोट सुटलं तर पाणी प्या, आचार्य बाळकृष्ण यांचा सल्ला-उपाशीपोटी ‘हा’ पदार्थ पाण्यात घालून प्या..

पोट सुटलं तर पाणी प्या, आचार्य बाळकृष्ण यांचा सल्ला-उपाशीपोटी ‘हा’ पदार्थ पाण्यात घालून प्या..

दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या वाढतच चालली आहे. बरेच लोक डाएट करतात, योगा करतात, व्यायाम करतात पण त्यात सातत्य ठेवत नाही आणि बरेच अन्हेल्दी पदार्थ खाण्यात येत असतात ज्यामुळे वजन वाढत जातं.  वजन कमी करण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईलसोबतच योग्य खाणंपिणं असणंही खूप महत्वाचे असते. आयुर्वेद एक्सपर्ट आचार्य बाळकृष्ण यांनी वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदीक उपायाबाबत सांगितले आहे.  त्यांनी एक उपाय सांगितला आहे. ज्यामुळे फक्त पाणी पिऊन तुमचं वजन कमी होऊ शकतं. (Weight Loss Tips By Acharya Balkrishna Acharya Balkrishna Told The Ayurvedic Method Of Belly Fat Loss)

वजन कमी करण्यासाठी आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलेला उपाय कोणता?

आचार्य बाळकृष्ण यांनी ज्या पदार्थाबाबत सांगितले आहे तो म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधाचे पाणी रोज प्यायल्यानं वेगानं वजन कमी होण्यास मदत होते. हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा वजन कमी करण्यासाठी हे परिणामकारक ठरत असल्याचं सांगतात.

 अश्वगंधाचे पाणी वजन कसे कमी करते?

अश्वगंधा ताण-तणाव कमी करण्यासाठी उत्तम मानले जातो. जेव्हा आपण जास्त ताण घेतो तेव्हा कोर्टिसोलचा स्तर वाढतो. कोर्टीसोल वाढल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते आणि जास्त भूक लागते. अश्वगंधा कोर्टिसोल नियंत्रणात ठेवतो. ज्यामुळे स्ट्रेस इटींगची सवय कमी होते.

अश्वगंधा एंटी ऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतो. ज्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो ज्यामुळे शरीर आरामात कॅलरीज बर्न करू शकते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. अश्वगंधाचं पाणी प्यायल्यानं शरीरात एनर्जी आणि स्टॅमिना दोन्ही वाढते.

अश्वगंधाचे पाणी तयार करण्याची योग्य पद्धत

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर आणि थोडं मध मिसळून प्या. याव्यतिरिक्त अश्वगंधाची सुकलेली मुळं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी उकळवून गाळून मग कोमट करून प्या.  या उपायानं शरीरात बदल झालेला दिसेल आणि वजनही कमी होईल.  दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या, जंकफूड कमी खा, तळलेले-गोड पदार्थ खाणं टाळा, दिवसभरातून १ तास तरी व्यायाम करा, लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा.

Web Title : आचार्य बालकृष्ण की अश्वगंधा जल विधि, पेट की चर्बी तेजी से कम करे।

Web Summary : पेट की चर्बी से परेशान हैं? आचार्य बालकृष्ण अश्वगंधा जल पीने का सुझाव देते हैं। यह तनाव कम करता है, मेटाबॉलिज्म बढ़ाता है और कैलोरी बर्न करता है। अच्छे परिणामों के लिए स्वस्थ आदतों के साथ रोजाना पिएं।

Web Title : Acharya Balkrishna's Ashwagandha water recipe for quick belly fat loss.

Web Summary : Suffering from stubborn belly fat? Acharya Balkrishna suggests drinking Ashwagandha water. It reduces stress, boosts metabolism, and burns calories. Drink daily for best results, alongside healthy habits.