Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हल्काफुल्का समजून डोशावर ताव मारता? तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला-डोसा खाल्ला तर...

हल्काफुल्का समजून डोशावर ताव मारता? तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला-डोसा खाल्ला तर...

Tamannaah Bhatia trainer advice to avoid masala dosa for weight loss : masala dosa for weight loss : avoid masala dosa for weight loss वजन कमी करायचंय? मग 'या' कारणासाठी मसाला डोसा टाळा; सेलिब्रिटी ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी सांगितलं खरं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 20:00 IST2026-04-29T20:00:00+5:302026-04-29T20:00:07+5:30

Tamannaah Bhatia trainer advice to avoid masala dosa for weight loss : masala dosa for weight loss : avoid masala dosa for weight loss वजन कमी करायचंय? मग 'या' कारणासाठी मसाला डोसा टाळा; सेलिब्रिटी ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी सांगितलं खरं कारण...

Tamannaah Bhatia trainer advice to avoid masala dosa for weight loss avoid masala dosa for weight loss | हल्काफुल्का समजून डोशावर ताव मारता? तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला-डोसा खाल्ला तर...

हल्काफुल्का समजून डोशावर ताव मारता? तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला-डोसा खाल्ला तर...

सकाळच्या नाश्त्याला गरमागरम, कुरकुरीत डोसा समोर आला की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. दक्षिण भारतीय पदार्थ केवळ चविष्टच नाहीत, तर ते हलके आणि पचायला सोपे असल्याने आरोग्यासाठीही उत्तम मानले जातात. एक गरमागरम, कुरकुरीत डोसा, सोबत चविष्ट सांबार आणि खोबऱ्याची चटणी... हा केवळ साऊथ इंडियन नाश्ता नाही, तर करोडो भारतीयांचे 'इमोशन' आहे! पचायला हलका आणि चवीला भारी असलेला हा पदार्थ आपण हेल्दी समजून ताव मारतो. पण, जर तुम्हाला असं सांगितलं की, हा तुमचा आवडता नाश्त्याचा पदार्थच तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतोय किंवा  वेटलॉस करण्यात अडथळा ठरतोय, तर? खुद्द अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि कंगना रणौत सारख्या अभिनेत्रींना फिट ठेवणाऱ्या फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंहने   मसाला डोसा खाण्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. वेटलॉस साठी फायदेशीर असणारा डोसा नक्की अनहेल्दी का ठरतोय आणि डोसा खाऊन आपण आपल्या फिटनेस मेंटेन्ड करण्यात नकळत कोणती चूक करतोय? (Tamannaah Bhatia trainer advice to avoid masala dosa for weight loss).

वजन कमी (dosa diet tips for weight loss) करायचंय म्हणून आपण सकाळच्या नाश्त्यात साऊथ इंडियन डोसा (best way to eat dosa without gaining weight) खाण्याला पसंती देतो. पण थांबा! प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांच्या मते, डोसा वजन कमी करण्याऐवजी तो वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. 'डोसा वाईट नाही, पण तो खाण्याची (avoid masala dosa for weight loss) पद्धत तुमचं वजन वाढवू शकते' असं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह सांगतो. 

वेटलॉस करताना डोसा खाणं खरंच अनहेल्दी आहे का ? 

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह याचं म्हणण आहे की, खरी समस्या लवकर भूक लागण्याची आहे. डोसा खाल्ल्यानंतर साधारण एका तासानंतर पुन्हा भूक लागल्यासारखे वाटते. अशा वेळी तुम्हाला काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होते, ज्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेता. डोसा प्रामुख्याने तांदूळ आणि डाळीपासून बनतो, त्यामुळे तो लवकर पचतो. ऐकायला ही चांगली गोष्ट वाटते, पण याचा अर्थ असाही आहे की, यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहत नाही. अशा परिस्थितीत, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हे योग्य नाही. म्हणजेच, वजन वाढण्याचे कारण 'डोसा' स्वतः नसून, त्यानंतर वारंवार काहीतरी खाण्याची लागलेली सवय हे आहे. 

घर -ऑफिस- काम -चिडचिड-हार्मोनल घोळ झाल्यानं स्ट्रेस वाढलाय, ६ सवयी बदला-जगणंच बदलेल...

मग वजन कमी करताना डोसा खाणं टाळावं का ? 

सिद्धार्थ सांगतो की, असं अजिबात नाही. त्याचे असे म्हणणे आहे की, डोसा खाणे सोडण्याची गरज नाही, तर तो थोडा अधिक पौष्टिक बनवण्याची गरज आहे. त्याच्या मते, 'डोसा अनहेल्दी नाही, फक्त त्यात काही आवश्यक गोष्टींची कमतरता असते.

ना जिम ना डाएट, म्हातारेही दिसतात तरुण, जपानी लोकांच्या ५ सवयी म्हणजे दीर्घायुष्य आणि तारुण्याचं वरदान...

डोसा अधिक हेल्दी कसा करता येईल?

सिद्धार्थ डोसा अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये प्रोटीनचा समावेश करण्याचा सल्ला देतात. उदाहरणार्थ, तुम्ही डोश्यामध्ये किसलेले पनीर घालून त्याचा मसाला तयार करू शकता, असे केल्याने नाश्ता संतुलित होतो. पनीर मधील प्रोटीन पचनाची प्रक्रिया थोडी हळूहळू करते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

दुसरीकडे, जर तुम्हाला पनीर आवडत नसेल, तर तुम्ही प्रोटीनचे इतर पर्याय जोडू शकता. जसे की, पनीर भुर्जीचे स्टफिंग, सोबत शेंगदाणा किंवा ओल्या नारळाची चटणी, दाट आणि भरपूर डाळ असलेले सांबार. याचाच अर्थ असा की, वेटलॉस करण्यासाठी डोसा खाणच सोडण्याची गरज नाही, तर फक्त आपल्या नाश्त्याला थोडे संतुलित आणि अधिक पौष्टिक करणे गरजेचे असते.


Web Title : क्या आप बेफिक्र होकर डोसा खाते हैं? तमन्ना भाटिया के ट्रेनर की सलाह

Web Summary : डोसा हल्का होने के बावजूद, अगर सही तरीके से न खाया जाए तो वजन घटाने में बाधा बन सकता है। सेलिब्रिटी ट्रेनर सिद्धार्थ सिंह का कहना है कि डोसा खाने के बाद बार-बार भूख लगने से ज़्यादा खाया जाता है। वे पनीर जैसे प्रोटीन मिलाकर डोसा को स्वस्थ बनाने की सलाह देते हैं।

Web Title : Enjoying Dosa Thoughtlessly? Tamannaah Bhatia’s Trainer's Advice: If you eat Dosa...

Web Summary : Dosa, though light, can hinder weight loss if not eaten right. Celebrity trainer Siddhartha Singh reveals that frequent hunger after eating dosa leads to overeating. He advises making dosa healthier by adding protein like paneer to keep you full longer. So, balance your dosa for effective weight management.