Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > AC चा गार वारा दिवसभर भलेही आराम देतो, पण वाढवतोय किडनी स्टोनचा धोका; पाहा काय असतं नेमकं कारण....

AC चा गार वारा दिवसभर भलेही आराम देतो, पण वाढवतोय किडनी स्टोनचा धोका; पाहा काय असतं नेमकं कारण....

Dehydrated In AC Rooms : अनेकदा दिवसभर ऑफिसच्या एसीमध्ये बसून काम करणारे लोकच जास्त डिहायड्रेटेड होतात. फरक हाच आहे की, ही समस्या हळूहळू आणि गुपचूप वाढते. आता हे कसं होतं ते समजून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:05 IST2026-05-08T09:59:20+5:302026-05-08T10:05:57+5:30

Dehydrated In AC Rooms : अनेकदा दिवसभर ऑफिसच्या एसीमध्ये बसून काम करणारे लोकच जास्त डिहायड्रेटेड होतात. फरक हाच आहे की, ही समस्या हळूहळू आणि गुपचूप वाढते. आता हे कसं होतं ते समजून घेऊया.

Why office workers get dehydrated in AC rooms, doctors tell the real reason | AC चा गार वारा दिवसभर भलेही आराम देतो, पण वाढवतोय किडनी स्टोनचा धोका; पाहा काय असतं नेमकं कारण....

AC चा गार वारा दिवसभर भलेही आराम देतो, पण वाढवतोय किडनी स्टोनचा धोका; पाहा काय असतं नेमकं कारण....

Why Office Workers Get Dehydrated In AC Rooms : घरातून बाहेर पडताच आग ओकणारा सूर्य जेव्हा डोक्यावर पडतो, तेव्हा जीव कासावीस होतो. घामाने शरीर पार भिजून जातं. घाम गेल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे डिहायड्रेशन होतं. सामान्यपणे एक असा समज असतो की, जास्त वेळ उन्हात काम करणाऱ्या लोकांनाच जास्त डिहायड्रेशनची समस्या होते. पण मुळात सत्य वेगळंच आहे. अनेकदा दिवसभर ऑफिसच्या एसीमध्ये बसून काम करणारे लोकच जास्त डिहायड्रेटेड होतात. फरक हाच आहे की, ही समस्या हळूहळू आणि गुपचूप वाढते. आता हे कसं होतं ते समजून घेऊया.

डॉ. पी. विक्रांत रेड्डी यांनी TOI ला सांगितलं की, वरवर सगळ्यांनाच असं वाटतं की, बाहेर काम करणारे लोकच अधिक डिहायड्रेटेड होत असतील, पण मुळात ऑफिसमध्ये बसून काम करणारे लोकच पाणी कमी पितात. याचं कारण आळस नाही तर आपली काम करण्याची पद्धत आणि वातावरण आहे.

एसी भलेही गार वारा देतो, पण करतो नुकसान

एअर कंडीशनरमध्ये बसून शरीराचे संकेत कमजोर होऊ लागतात. सामान्यपणे तहान लागल्यावर आपल्याला पाणी पिण्याचा संकेत मिळतो. पण जेव्हा घाम येत नाही, गरम होत नाही तेव्हा हे संकेत हळूहळू कमजोर होतात. बराच वेळ निघून जातो आणि आपल्याला जाणीवही होत नाही की, शरीरातील पाणी कमी होत आहे. एसी भलेही थंड वारा देतो, पण त्याने कोरडेपणाही वाढतो. शरीर त्वचा आणि श्वासांच्या माध्यमातून सतत पाणी गमावत असतं. फक्त ते दिसत नाही. हेच कारण आहे की, एसीमध्ये बसणारे लोकही डिहायड्रेशनचे शिकार होतात, पण त्याची त्यांना लगेच जाणीव होत नाही.

चहा आणि कॉफीही घातक  

ऑफिसमध्ये थोड्या थोड्या वेळाने चहा किंवा कॉफी घेण्याची अनेकांना सवय असते. या सवयीमुळेही समस्या वाढते. अनेकांना असं वाटतं की, ते चहा किंवा कॉफीच्या माध्यमातून तरल पदार्थ घेत आहेत. पण मुळात यांनी शरीरात पाणी वाढत नाही. हे पेय पाण्याची जागा घेतात. चहा किंवा कॉफीने शरीर हायड्रेट राहत नाही. हेच कारण आहे की, दिवसाच्या शेवटी थकवा आणि जडपणा जाणवतो.

डिहायड्रेशनची लक्षणं

डिहायड्रेशनची लक्षण फारच सामान्य असतात जसे की, हलकी डोकेदुखी, फोकस करण्यास अडथळा किंवा सायंकाळपर्यंत थकवा. लोक या लक्षणांना कामाचा ताण किंवा झोपेची कमतरता समजतात. पण अनेक या लक्षणांचं मुख्य कारण पाण्याची कमतरता असतं. जास्त वेळ बसून राहिल्याने ही समस्या अधिक वाढते. जेव्हा आपण एकाच जागी बसून काम करतो, तेव्हा शरीराच्या संकेतांवर लक्षच जात नाही. ना जागेवर उठण्याची संधीही मिळत नाही आणि पाणी प्यायचंही लक्षात राहत नाही.

डॉक्टरांनी इशारा दिला की, जर जास्त वेळ शरीरात पाण्याची कमतरता झाली तर यामुळे किडनी स्टोन किंवा यूरिन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. ही समस्या लगेच दिसत नाही, पण हळूहळू गंभीर होऊ शकते. चांगली बाब ही आहे की, ही समस्या दूर करणं फार काही अवघड नाही. फक्त दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय पाडा. चहा किंवा कॉफी कमी प्या आणि कामातून थोड्या थोड्या वेळाने छोटे छोटे ब्रेक घ्या.

Web Title : एसी का आराम बढ़ा सकता है किडनी स्टोन का खतरा: कारण समझें

Web Summary : एसी डिहाइड्रेशन का कारण बन सकता है, जिससे किडनी स्टोन का खतरा बढ़ता है। ऑफिस में काम करने वाले अक्सर अनजाने में कम पानी पीते हैं। चाय, कॉफी इसे और खराब करते हैं। नियमित रूप से पानी पिएं, ब्रेक लें।

Web Title : AC Comfort Increases Kidney Stone Risk: Understand the Reason

Web Summary : AC can cause dehydration, increasing kidney stone risk. Office workers often unknowingly drink less water. Tea, coffee worsen it. Drink water regularly, take breaks.