Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ८ तास झोपूनही झोप पूर्ण होत नाही? पाहा वयानुसार कुणी किती झोपावं, तेव्हाच शरीर राहील चांगलं...

८ तास झोपूनही झोप पूर्ण होत नाही? पाहा वयानुसार कुणी किती झोपावं, तेव्हाच शरीर राहील चांगलं...

Sleeping Tips : चांगल्या झोपेचं सायन्स हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेसंबंधी लोकांचे अनेक गैरसमज आहेत. तसं पाहिलं तर ८ तास झोप घेण्याचा नियम हा एक सरासरी आकडा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:11 IST2026-05-07T11:08:22+5:302026-05-07T11:11:27+5:30

Sleeping Tips : चांगल्या झोपेचं सायन्स हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेसंबंधी लोकांचे अनेक गैरसमज आहेत. तसं पाहिलं तर ८ तास झोप घेण्याचा नियम हा एक सरासरी आकडा आहे.

How many hours of sleep are enough for good health? | ८ तास झोपूनही झोप पूर्ण होत नाही? पाहा वयानुसार कुणी किती झोपावं, तेव्हाच शरीर राहील चांगलं...

८ तास झोपूनही झोप पूर्ण होत नाही? पाहा वयानुसार कुणी किती झोपावं, तेव्हाच शरीर राहील चांगलं...

Sleeping Tips : झोप घेणं सगळ्यांसाठीच महत्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशी कोणतंही काम बरोबर होत नाही. अनेकदा तर असंही होतं की, ८ तास झोपूनही खूप आळस येतो किंवा थकल्यासारखं जाणवतं. इतकंच नाही तर शरीरात जडपणाही जाणवतो. असं अनेकांसोबत होतं. पण का होतं? याचं उत्तर काही कुणाला माहीत नसतं. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, चांगली झोप लागण्यासाठी काय करायला हवं? तेच आज आपण जाणून घेणार आहोत. 

चांगल्या झोपेचं सायन्स हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेसंबंधी लोकांचे अनेक गैरसमज आहेत. तसं पाहिलं तर ८ तास झोप घेण्याचा नियम हा एक सरासरी आकडा आहे. हे काही फिक्स प्रमाण नाही. आपल्या शरीराला किती तासांची झोप हवी आणि चांगली झोप मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याचं विज्ञान माहीत असणं फार गरजेचं आहे.

वयानुसार झोपेची गरज बदलते 

नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार, प्रत्येक व्यक्तीसाठी झोपेचा काही असा फिक्स नियम असू शकत नाही. झोपेचं प्रमाण हे आपल्या वयावर आणि शरीराच्या गरजेवर अवलंबून असतं. वयानुसार झोपेचं प्रमाण किती असावं हे जाणून घेऊया.

वयानुसार किती झोपावं?

नवजात शिशु (०-३ महिने) - १४ ते १७ तास
मुले (६-१३ वर्षे) - ९ ते ११ तास
किशोरवयीन (१४-१७ वर्षे) - ८ ते १० तास
प्रौढ (१८-६४ वर्षे) - ७ ते ९ तास
ज्येष्ठ नागरिक (६५+ वर्षे) - ७ ते ८ तास

यावरून स्पष्ट होतं की प्रौढांसाठी ७ ते ९ तासांची झोप आदर्श मानली जाते. तुमचे शरीर ७ तासांतही थकवा दूर करू शकतं, तर काहींना ९ तासांची झोप आवश्यक असू शकते. झोप पूर्ण झाल्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तुम्ही सकाळी अलार्मशिवाय ताजेतवाने उठता आणि दिवसभर सुस्ती जाणवत नाही. 

झोपेच्या वेळेपेक्षा क्वालिटी महत्वाची  

एक्सपर्ट सांगतात की, केवळ ८ तास बेडवर डोळे लावून पडून राहणं पुरेसं नाही. जर आपण रात्री बेडवर व्यवस्थित झोपत नसाल, आपले डोळे उघडे राहत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल तर या झोपेचा काही फायदा नाही. तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर गाढ झोप महत्वाची ठरते. गाढ झोपेतच आपलं शरीर आतून चांगलं रिपेअर होऊ शकतं. मेंदू शांत होतो आणि इम्युनिटी मजबूत होते.     

कमी किंवा जास्त झोपेचे दुष्परिणाम

झोपेबाबत कोणतीही तडजोड आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सतत ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह आणि नैराश्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कामावर लक्ष केंद्रित होत नाही आणि स्वभाव चिडचिड होऊ शकते.

दुसरीकडे, १० किंवा ११ तासांपेक्षा जास्त झोप घेणेही योग्य नाही. अतिजास्त झोपेमुळे शरीरात सुस्ती, डोकेदुखी आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. तसेच, हे शरीरातील एखाद्या बिघाडाचं लक्षणही असू शकतं.

निरोगी आणि शांत झोपेसाठी सोपे उपाय

आपल्या शरीराची गरज समजून घ्या. दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचे लक्ष्य ठेवा.

झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा आणि सुट्टीच्या दिवशीही ती बदलू नका.

झोपण्याच्या किमान १ तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीनपासून दूर राहा.

रात्री चहा, कॉफी आणि अतिजड अन्न खाणे टाळा.

झोपताना खोलीत अंधार ठेवा, त्यामुळे झोपेत व्यत्यय येत नाही.

Web Title : उम्र के अनुसार पर्याप्त नींद जरूरी: जानिए कितनी नींद है जरूरी।

Web Summary : उम्र के अनुसार नींद की जरूरत बदलती है। वयस्कों को 7-9 घंटे की नींद चाहिए। लगातार नींद का कार्यक्रम, अंधेरे कमरे और देर रात कैफीन से परहेज करने से नींद की गुणवत्ता में सुधार होता है। खराब नींद स्वास्थ्य को प्रभावित करती है; अच्छी सेहत के लिए आराम को प्राथमिकता दें।

Web Title : Adequate sleep needed for age: Know how much sleep is essential.

Web Summary : Sleep needs vary by age. Adults need 7-9 hours. Consistent sleep schedules, dark rooms, and avoiding late-night caffeine improve sleep quality. Poor sleep impacts health; prioritize rest for well-being and daily freshness.