Drinks to lower uric acid: यूरिक अॅसिडची समस्या अलिकडे बऱ्याच लोकांमध्ये बघायला मिळते. आपणही अनेकदा हा शब्द ऐकला असेल. पण अजूनही अनेकांना ही समस्या नेमकी काय आणि कशामुळे होते हे माहीत नाही. मुळात यूरिक अॅसिड आपल्या शरीरातील प्यूरीन नावाचं प्रोटीनमधून तुटणारा कचरा आहे. हे अॅसिड रक्तात मिसळतं, किडनीपर्यंत पोहोचतं आणि लघवीद्वारे बाहेर पडतं. पण जेव्हा याचं प्रमाण शरीरात अधिक वाढतं तेव्हा तळपाय किंवा टाचांमध्ये खूप वेदना होतात. सामान्यपणे यूरिक अॅसिड प्यूरीन असलेलं अन्न जसे की, डाळी, रेड मीट, दारूमुळे वाढतं. शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने ते छोटे छोटे आणि टोकदार अशा क्रिस्टल्समध्ये बदलतं आणि शरीरातील जॉइंट्समध्ये जाऊन जमा होतं. यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात, पण अनेकांना हेही जाणून घ्यायचं असतं की, यूरिक अॅसिड घरगुती उपाय करून किंवा काही नॅचरल ड्रिंकने कमी केलं जाऊ शकतं का?
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि हल्लीच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे यूरिक अॅसिड वाढणं एक कॉमन समस्या बनलं आहे. याने पुढे जाऊन जॉइंट्समध्ये असह्य वेदना आणि सूज वाढू शकते. अशात औषधांसोबतच नॅचरल उपायांचा देखील फायदा मिळू शकतो. जर आपल्याला सुद्धा ही समस्या असेल तर सकाळी उपाशीपोटी काही गोष्टींचं सेवन करून यूरिक अॅसिड कंट्रोल करू शकता.
लिंबू पाणी - यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस पिळा. लिंबाच्या रसातील व्हिटामिन सी आणि सायट्रिक अॅसिडने शरीरात वाढलेलं यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यास मदत मिळू शकते.
ओव्याचं पाणी - यूरिक अॅसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी सुद्धा एक चांगला पर्याय मानलं जातं. ओव्यातील अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी-ऑक्सीडेंट गुण जॉइंट्समधील सूज आणि वेदना कमी करतात.
अॅपल व्हिनेगर - यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी अॅपल व्हिनेगर सुद्धा फायदेशीर मानलं जातं. यातील मॅलिक अॅसिड यूरिक अॅसिड तोडण्यास मदत करतं. एक ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे व्हिनेगर घालून पिऊ शकता. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्याल तर फायदा मिळेल.
जिऱ्याचं पाणी - जिऱ्यांमध्ये अँटी-ऑक्सीडेंट आणि असे काही तत्व असतात, जे सूज कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यास मदत मिळते. यासाठी एक चमचा जिरे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गरम करून प्या.
भरपूर साधं पाणी - वरील काही नॅचरल ड्रिंकसोबतच आपण रोज सकाळी उपाशीपोटी साधं पाणीही प्या. दिवसभरातून साधारण २.५ ते ३ लीटर पाणी प्यायल्यास यूरिक अॅसिड बाहेर काढण्यास मदत मिळेल.
